पी. व्ही. िंसधूची आकाशाला गवसणी- तेजस विमानातून भरारी
   दिनांक :23-Feb-2019
बंगळुरू,
रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. िंसधू हिने बॅडिंमटन कोर्टहून झेपावत थेट आकाशाला गवसणी घातली आहे. थोडा वेळ का होईना िंसधूने एरो इंडिया 2019 एअर शोदरम्यान भारतनिर्मित लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एलसीए) या तेजस विमानातून सहवैमानिक म्हणून आकाशात भरारी मारली.
 
 
 
बंगळुरूमध्ये सुरू असलेल्या एरो इंडिया, एअर शोमध्ये िंसधू सहभागी झाली होती. भारतीय हवाईदलात नुकत्याच दाखल झालेल्या तेजस विमानातून िंसधूने उड्डाण केले. यावेळी िंसधूने वैमानिकाला आवश्यक असलेला हिरवा युनिफॉर्म परिधान केला होता. शिडीने चढत तिने विमानाच्या कॉकपीटमध्ये प्रवेश केला. त्यानंतर हे तेजस विमान आकाशात झेपावले. यावेळी अनेक मान्यवर येथे उपस्थित होते.
 
िंहदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेड कंपनीद्वारे तेजस हे बहुद्देशीय हलके लढाऊ विमान बनवण्यात आले आहे. सर्व सोपस्कार पार पाडून हवाई दलाच्या खात्यात तेजस सहभागी झाले आहे.
 
एअर शोच्या अखेरच्या दिवशी हवाई दलात महिला सैनिकांनी केलेल्या उत्तम कामगिरीचा गौरव करण्यात आला. त्यानिमित्त िंसधूची तेजस विमानातून उड्डाण करण्यासाठी निवड करण्यात आली.