न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तानच्या वाणिज्य दुतावासासमोर भारतीयांनी केले निषेध
   दिनांक :23-Feb-2019
 
 
 
न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तानच्या वाणिज्य दुतावासासमोर भारतीयांनी निदर्शने केली आहेत. पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. गुरुवारी (14 फेब्रुवारी) जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला झाला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. हल्ल्यानंतर न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तान निषेधाच्या घोषणा घुमल्या आहेत.