अंभोरे गटाच्या आरोपींना त्वरीत अटक करा अन्यथा जनआंदोलन - गाभणे समर्थकांचा मोर्चाद्वारे इशारा
   दिनांक :23-Feb-2019
शिरपूर जैन,
अंभोरे गटाच्या मुख्य आरेापींना त्वररीत अटक करावी, अन्यथा जनआंदोलन व आमरण उपोषण करण्यात येईल, असा ईशारा 23 फेब्रुवारी रोजी ठाणेदारांना दिलेल्या निवेदनातून गाभणे समर्थकांनी दिला आहे. अंभोरे गटाच्या मुख्य आरोपींना तात्काळ अटक व्हावी, यासाठी गाभणे समर्थकांनी शिरपूर येथे मोर्चा काढला होता.
 
 
 
 
शिरपूर येथे ढवळे विद्यालयासमोर क्षुल्लक कारणाहून गाभणे व अंभोरे यांच्यात वाद झाला होता. यामध्ये गाभणे गटाच्या तीन सख्ये भाऊ गंभीर जखमी झाले. त्यामुळे अंभोरे गटाविरुद्ध कलम 307 भादंविनुसार गुन्हा दाखल आहे. तेव्हापासून अंभोरे गटाचे मुख्य आरेापी फरार आहेत. संतोष प्रकाश गाभणे रा. शिरपूर यांनी निवेदनात नमूद केल्यानुसार अंभोरे गटाच्या मुख्य आरोपींना कलम 164 अन्वये ताबडतोब अटक करावी, अन्यथा शिरपूर गावातील नागरिक जनआंदोलन करतील तसेच वेळ पडल्यास किंवा मुख्य आरोपीला लवकरात लवकर अटक न केल्यास आमरण उपोषणाचा पवित्रा घ्यावा लागेल, असे निवेदनात नमूद आहे.
 
 
23 फेब्रुवारीला शिरपूर येथे गाभणे समर्थकांनी काढलेल्या मोर्चात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये माजी सरपंच गणेश भालेराव, माजी सरपंच सुशांत जाधव, शिरपूर काँग्रेस कमेटीेच अध्यक्ष नंदकिशोर गोरे, अलिमखॉ पठाण, मोहीबखॉ पठाण, गणेश इरतकर, सुनिल गाभणे, भिवा चोपडे आदी गाभणे समर्थकांचा समावेश होता. मुख्य आरोपींना लवकरात लवकर पेालिस अटक करतील असे ठाणेदार सुरेश नाईकनवरे यांनी गाभणे समर्थकांना आश्‍वासन देऊन आरोपी हा कितीही मोठ्या गुंड प्रवृत्तीचा असला तरी पोलिस त्याला अटक केल्याशिवाय स्वस्थ बसार नाही, असेही ठाणेदार सुरेश नाईकनवरे यांनी गाभणे समर्थक मोर्चेकरांना सांगितले.