चिखलदर्‍यात कार दरीत कोसळून एकाच मृत्यू
   दिनांक :23-Feb-2019
आईचा मृत्यू, मुलगा गंभीर
अचलपूर,
चिखलदरा अचलपूर मार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दरीत कोसळली. या अपघातात वृद्ध आईचा घटनास्थळी मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी आहे. हा अपघात शुक्रवारी संध्याकाळी चिखलदरा मार्गावर घटांग जवळ झाला. शनिवारी ही घटना उघडकीस आली.

 
प्राप्त माहितीनुसार, अचलपूर पंचायत समितीचे माजी सभापती व धामणगाव गढी येथील निवासी जयदेवराव गायकवाड यांचा मुलगा संजय ( ४५ ) व आई कुसुम उर्फ पार्वतीबाई गायकवाड ( ७०) हे दोघे धारणी येथून साक्षगंध आटोपून एमएच २७ वीयू ३७६१ क्रमांकाच्या कारने येत होते. दरम्यान चिखलदरा - धारणी रस्त्यावर घंटागजवळ संजयचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती दरीत कोसळली. झालेल्या अपघातात पार्वतीबाई या जागीच ठार झाल्या तर मुलगा संजय गंभीर जखमी आहे.