नाट्य सम्मेलनाला मुख्यमंत्र्यांची हजेरी
   दिनांक :23-Feb-2019
 
 नागपूर : नागपूर येथे होत असलेल्या  ९९ व्या अ.भा. मराठी नाट्यसंमेलनाला मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी आज हजेरी लावली.  मुख्यमंत्र्यांसोबतच  केंद्रीय मंत्री रामदास आठवले, कीर्ति शिलेदार, प्रेमानंद गज्वीसुद्धा कार्यक्रमाला उपस्थित होते. 
महाराष्ट्राची एक समृद्ध नाट्यपरंपरा आहे. काही कला आज लुप्त होत असल्या तरी मराठी प्रेक्षक आणि रंगभूमीने त्या जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. या सोबतच विदर्भातील रसिकांनी नेहमीच नाट्यपरंपरेला  भरभरून प्रतिसाद दिला. असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. यावेळी झाडीपट्टीतल्या नाट्य चळवळीचाही त्यांनी गौरव केला.  

 
नाट्यसंमेलनात झालेल्या त्यांच्या भाषणात त्यांनी राज्याच्या सुरक्षतेची ग्वाही देत देश विरोधी कारवाई करणाऱ्यांवर सरकार कठोर कारवाई करेल असे ते म्हणाले.  पुढचे 100 वे अ.भा. मराठी नाट्यसंमेलन नागपुरात घेण्याचा ठराव केल्यास सरकार सर्वोतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही  मुख्यामंत्र्यांनी यावेळी दिली.