भाजपा कॉग्रेसचे कार्यकर्ते आपसात भिडले
   दिनांक :23-Feb-2019
धोत्राभनगोजी येथील शालेय कार्यक्रमात वाद,चिखलीत पडसाद
 
चिखली:
तालुक्यातील धोत्राभनगोजी येथे शाळेच्या कार्यक्रमात आ.राहुल बोन्द्रे आणि भाजपाच्या श्वेताताई महाले यांच्या भाषणातून शाब्दिक वादावादी झाली.आणि त्यानंतर भाजपा कॉग्रेसचे कार्यकर्ते समोरा समोर आले, त्यातुनच एका भाजपा कार्यकर्त्याला मारहाण झाली. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल करण्यासाठी धाव घेतली.याठीकाणी हजारांहून अधिकचा जमाव दाखल झाला.जमावाने केलेल्या दगडफेकीत 3 पोलीस कॉन्स्टेबल आणि 1 पीएसआय जखमी झाले.आक्रमक झालेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलीसांनी लाठीचार्ज केला.ही घटना काल रात्री घडली.
 
निवडणुकीच्या तोंडावर चिखलीतील राजकारण चांगलेच तापले असुन कॉग्रेसचे आमदार राहुल बोन्द्रे आणि महिला बालकल्याण समिती सभापती श्वेताताताई महाले यांच्या मध्ये खटके उडण्यास सुरवात झाली असुन धोत्राभनगोजी येथे घडलेल्या घटनेचे पडसाद शहरा उमटण्यास सुरवात झाली आहे.पोलीस स्टेशनमध्ये देखील दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली.पोलीसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.दरम्यान, या प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक पत्रपरिषद घेणार असल्याचे कळते.