अमरावतीत वेगवेगळ्या ठिकाणी चौघांची आत्महत्या
   दिनांक :23-Feb-2019
अमरावती,
शहरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये शनिवारी चौघांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे . त्यात दोन तरुणांसह एका तरुणीचा व एका इसमाचा समावेश आहे.

 
पहिली घटना राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सामरा नगर परिसरात उघडकीस आली. येथील २३ वर्षीय कल्याणी नांदुरकर या तरुणीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या तरुणीने आत्महत्येपूर्वी दोन पानांची एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. पोलिसांनी ती ताब्यात घेतली असून त्यात वैयक्तिक कारणांनी त्रस्त झाल्यामुळे आत्महत्या करित असल्याचे नमूद आहे. दुसरी घटना ठाण्याच्या कुंभारवाडा भागात समोर आली आहे.  १९ वर्षीय शुभम ठाकूर याने राहत्या घरी आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नाही. तिसरी घटना बडनेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतल्या इंदिरा नगर परिसरात समोर आली आहे. मंगल हरणे या ३५ वर्षीय युवकानेसुद्धा आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. घरगुती वादातून हरणे यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. चौथी घटना याच पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या नवी वस्ती बडनेरा येथे घडली आहे.  येथील राजाभाऊ गंधे या ४५ वर्षीय इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. गेल्या काही दिवसापासून गंधे विवंचनेत होते. त्या विवंचनेतूनच त्यांनी गळफास घेतला असावा, असा अंदाज पोलिसांना आहे.