आगीत सोन्याचांदीचे दुकान खाक
   दिनांक :23-Feb-2019
 
 
 हिंगणघाट - स्थानिक टिळक चौकात एम के पोहेकर ज्वेलर्सला आग लागून फर्निचर व सोन्या चांदीचे तयार आभूषणे जळाल्याने अंदाजे साडेपाच लाखाचे नुकसान झाले आहे .प्राप्त माहिती नुसार मनोज खुशाबराव पोहेकर यांच्या दुकानात दागिने घडणावळीचे काम सुरू असतांना आज दुपारी तीन वाजताच्या दरम्यान ही आग लागली. यावेळी गॅस सिलेंडरचा पाईप लिकेज झाल्याने ही आग लागल्याची माहिती पोहेकर यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाल्याने इतर दुकानांची हानी टळली .