पी.व्ही सिंधूची ' तेजस ' विमानातून उड्डाण
   दिनांक :23-Feb-2019
भारताची आघाडीची बँडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने बंगळुरुत सुरु असलेल्या ‘एरो इंडिया, एअर शो’ मध्ये सहभाग घेतला. यावेळी सिंधूने भारतीय हवाईदलाच्या खात्यात नुकत्याच दाखल झालेल्या ‘तेजस’ विमानातून उड्डाणही केले. यावेळी अनेक मान्यवर येथे उपस्थित होते. हवाई दलात महिला सैनिकांनी केलेल्या उत्तम कामगिरीचा गौरव करण्यासाठी सिंधूची तेजस विमानातून उड्डाण करण्यासाठी निवड करण्यात आली.

 
 
हिंदुस्थान एरोनॉटीकल लिमीटेड कंपनीद्वारे बनविण्यात आलेले तेजस विमान नुकतेच सर्व सोपस्कार पार पाडून हवाई दलाच्या खात्यात सहभागी झाले आहे. या विमानामुळे हवाई दलाच्या ताकदीत अजुन भर पडणार असल्याचे मत अनेक संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले होते. काही दिवसांपूर्वी भारताचे लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनीही तेजस विमानातून उड्डाण केले होते.