नगर -औरंगाबाद हायवेवर भीषण अपघात : तिघांचा मृत्यू, २४ जण जखमी
   दिनांक :23-Feb-2019
नगर:
अहमदनगर येथे आज सकाळी दुधाचा टँकर आणि खासगी बस दरम्यान झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले असून १९ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असून या सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 
खासगी बस औरंगाबादहून नगरला येत असतांना नगर-औरंगाबाद महामार्गावर कांगोणी फाटा येथे पाठिमागून आलेल्या या बसने टँकरला जोरदार धडक दिली. अपघातात बसमधील १९ जण जखमी झाले. त्यातील तिघा जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. संजय रामकृष्ण सावळे, आकाश सुरेश चंगड आणि कल्पेश गुलाबराव व्यवहारे अशी या तिघा मृतांची नावे आहेत. हे तिघेही बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी आहेत.