राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प २७ फेब्रुवारीला : मुख्यमंत्री
   दिनांक :24-Feb-2019
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या संवादातील प्रमुख बिंदू...
 

  
  • राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प २७ फेब्रुवारीला सभागृहात मांडला जाईल.
  • या अधिवेशनात एकूण ११ विधेयके सादर केली जातील.
  • केंद्र सरकारच्या चमूने महाराष्ट्राला भेट देऊन ४७०० कोटी रूपयांची मदत जाहीर केली आहे. एकूण ८२ लाख शेतकर्‍यांपैकी ४२ लाख शेतकर्‍यांच्या खात्यात आतापर्यंत दुष्काळी मदतीची रक्कम जमा.
  • छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत ५१ लाख शेतकर्‍यांच्या खात्यांसाठी २४ हजार कोटी रूपये बँकांना देण्यात आले असून, १८ हजार कोटी रूपये शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. आदिवासींचे खावटी कर्ज सुद्धा राज्य सरकारने माफ केले आहे.
  • पीकविमा योजनेंतर्गत गेल्या १५ वर्षांत १.२६ कोटी शेतकर्‍यांना २९०० कोटी रूपये लाभ मिळाला तर आता अवघ्या ४ वर्षांत १३,१३५ कोटी रूपये शेतकर्‍यांना प्राप्त झाले आहेत. विविध प्रकारच्या कीडींच्या प्रादुर्भावासाठी सुद्धा ३३३६ कोटी रूपये शेतकर्‍यांना देण्यात आले आहेत.
  • एकूण ३ टप्प्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, आतापर्यंत २० हजारांहून अधिक गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. चारा, पाणी याची कुठेही कमतरता राहू नये, याची पूर्ण काळजी सरकारतर्फे घेतली जात आहे.