आमच्यात मुसंडी मारण्याची क्षमता : अनया श्राबसोल
   दिनांक :24-Feb-2019
- भारत-इंग्लंड महिलांचा दुसरा वन-डे सामना उद्या 
 
 
 
मुंबई, 
पहिल्या वन-डे सामन्यात भारताकडून ६६ धावांनी पराभव झाल्यानंतर विश्वविजेता इंग्लंडचा महिला संघ मालिकेत डोके वर काढण्यास उत्सुक आहे. उद्या सोमवारी मालिकेतील दुसरा वन-डे सामना खेळला जाणार आहे.
 
आमच्या संघात परिस्थिती बदलविण्याची क्षमता आहे. गत १८ महिन्यांच्या काळात आम्ही बरेच खाचखळगे बघितलेले आहे. पराभवाच्या स्थितीतून विजय मिळविला आहे आणि मालिकेत पुनरागमन केलेले आहे. आता भारताविरुद्धच्या मालिकेतही आम्ही अशीच मुसंडी मारू, असा विश्वास इंग्लंडची वेगवान गोलंदाज अनया श्राबसोल हिने व्यक्त केला आहे.
 
पहिल्या सामन्यात आम्ही हरलो असलो तरी आम्ही गोलंदाजी व क्षेत्ररक्षणाचे खरोखरच उत्कृष्ट प्रदर्शन केले, असे ५६ वन-डे सामन्यात ६९ बळी टिपणारी श्राबसोल म्हणाली. आम्हाला बर्‍याच गोष्टींसाठी बरेच काही करायचे आहे. इथल्या खेळपट्टीची कल्पना आली असून येथे दुसर्‍या डावात धावा काढणे अवघड राहणार आहे, असेही ती म्हणाली.