चीनमधील अपघातात 21 ठार
   दिनांक :24-Feb-2019

 
 
बीजिंग : 
 
चीनच्या उत्तरेकडील मोंगोलिया स्वायत्त प्रांतातील एका खाणीत झालेल्या बस अपघातात 21 जण ठार, तर 29 जखमी झाले. बस भरधाव असताना, चालकाने चुकीच्या पद्धतीने ब्रेक लावले. यामुळे बस उलटली आणि बोगद्यात पडली. खाणीतील 50 कामगार या बसमधून प्रवास करीत होते. जखमींना रुग्णालयात भरती करण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले.