भविष्यवाणी
   दिनांक :24-Feb-2019
रविवार, 24 फेब्रुवारी 2019
शके 1940, विक्रम संवत्‌ 2075, विलंबी नाम संवत्सर, उत्तरायण, सौर वसंत ऋतू, माघ कृ 6 (वद्य षष्ठी, 29.02 पर्यंत); (भारतीय सौर फाल्गुन- 5, हिजरी 1440 ः जमादिलाखर- 18)
नक्षत्र- स्वाती (21.59 पर्यंत); योग- वृद्धि (13.48 पर्यंत); करण- गरज (17.30 पर्यंत) वणिज (29.02 पर्यंत); नागपूर सूर्योदय- 6.40, सूर्यास्त- 18.14; दिनमान-11.34; चंद्र- तुला; दिवस- शुभ.
ग्रहस्थिती ः रवी- कुंभ, मंगळ- मेष, बुध (मार्गी/उदित)- कुंभ, गुरु- वृश्चिक, शुक्र - धनू/मकर, शनी- धनू, राहू- कर्क, केतू- मकर, हर्शल- मेष, नेपच्यून- कुंभ, प्लूटो- धनू.
दिनविशेष ः भद्रा (प्रारंभ 29.02), शुक्र मकर राशीत (22.41).
भविष्यवाणी ः
मेष- दगदग, धावपळ टाळा.
वृषभ- िंचता नको, मार्ग निघेल.
मिथुन- खर्चावर लगाम असावा.
कर्क- अपेक्षित घटना घडतील.
िंसह- आरोग्याची काळजी घ्या.
कन्या- अपेक्षित कामे होतील.
तूळ- एक साधारण दिवस.
वृश्चिक- दगदग करू नका.
धनू- अनपेक्षित घटनाक्रम.
मकर- आर्थिक व्यवहारात सावध.
कुंभ- अडचणी दूर होतील.
मीन- आकस्मिक खर्चाचे प्रसंग.
---------
साप्ताहिक राशीभविष्य-24 फेब्रुवारी ते 2 मार्च 2019
सप्ताह विशेष ः सोमवार, 25 फेब्रुवारी ः भद्रा (समाप्त 16.53), बुध मीन राशीत (8.50), श्री गजानन महाराज प्रगटदिन- शेगाव; मंगळवार, 26 फेब्रुवारी ः कालाष्टमी, स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी; बुधवार, 27 फेब्रुवारी ः श्री समर्थ रामदास स्वामी नवमी, मराठी राजभाषा दिन; गुरुवार, 28 फेब्रुवारी ः दशमी वृद्धीतिथी, भद्रा (प्रारंभ 19.37), राष्ट्रीय विज्ञान दिन; शुक्रवार, 1 मार्च ः भद्रा (समाप्त 8.36); शनिवार, 2 मार्च ः विजया एकादशी .
संक्षिप्त मुहूर्त ः साखरपुडा- 24, 26 फेब्रुवारी, 2 मार्च; बारसे- 24 फेब्रुवारी, 2 मार्च; जावळे- 24 फेब्रुवारी; गृहप्रवेश- 24,26 फेब्रुवारी, 2 मार्च.
साप्ताहिक राशीभविष्य
मेष- कामात धडाडी दिसणार
या आठवड्यात चंद्राचे भ्रमण आपल्या सप्तम स्थानातून प्रारंभ होत आहे. राशीस्वामी व चंद्राचा समसप्तक योग झाल्यामुळे या काळात आपल्याकडून काही धडाडीची कामे पूर्ण होऊ शकतील. विशेषतः कार्यक्षेत्रात आपल्या कामाची चुणूक दिसून येईल. काही धाडसाची पावले आपण या आठवड्यात उचलाल. त्याचे दीर्घकाळ उत्तम लाभ आपणास प्राप्त होत राहतील. कुटुंबातूनही आपल्या योजनांना चांगला प्रतिसाद मिळेल. प्रवासाच्या योजना संभवतात. काही मंगलकार्याची आखणी होईल. आजूबाजूला आनंद व समाधानाचे वातावरण राहील. विद्यार्थीवर्गाला हा आठवडा उत्साहवर्धक राहील.
शुभ दिनांक-14,25,1,2.
वृषभ- आर्थिक घडी मजबूत
या आठवड्यात चंद्राचे भ्रमण आपल्या सहाव्या कर्म स्थानातून सुरू होत आहे. आपला राशीस्वामी सुक्र व चंद्राचा लाभयोग झाला आहे. त्यामुळे आपली आर्थिक घडी या काळात मजबूत होताना दिसेल. विशेषतः व्यवसायात असलेल्या व्यक्तींची आवक वाढेल. जुनी येणी येऊ लागतील. काही अचानक निर्णयामुळे मोठा आर्थिक लाभ होऊ शकेल. व्ययातील मंगळ काही आकस्मिक घटनांची नोंद करू शकेल. कुटुंबात काही मोठ्या खरेदीचे विचार साकार होऊ शकतात. प्रवासाच्या योजना ठरतील. दरम्यान, काही किरकोळ घटना मनाचा हिरमोड करू शकतात. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी समाधानकारक काळ.
शुभ दिनांक- 24,25,26,27.
मिथुन- कामांमधून कस लागणार
या आठवड्यात चंद्राचे भ्रमण आपल्या पंचम स्थानातून प्रारंभ होत आहे. राशीस्वामी बुधाशीही त्याचा शुभ योग झालेला आहे. त्यामुळे आतापर्यंत काहीसा विस्कळीत ठरलेला काळ जरा सुगठित होऊन आपल्याला कार्यक्षेत्रात महत्त्व प्राप्त व्हावे. नोकरी- व्यवसायात व्यग्रता वाढेल. काही जबाबदारीची कामे आपल्याला आवर्जून दिली जाऊ शकतात. स्वतःचे महत्त्व वाढवून घेण्यासाठी हे लाभकारकच ठरेल. विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग वाढेल. दरम्यान, खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष कदापि होऊ देऊ नये. पथ्ये सांभाळावीत. विद्यार्थीवर्गास उत्तम काळ.
शुभ दिनांक- 25,26,27,28.
कर्क- सावध निर्णय घ्यावेत
या आठवड्यात राशीस्वामी चंद्राचे भ्रमण आपल्या सुखस्थानातून सुरू होत आहे, त्यामुळे या आठवड्याची सुरुवात एखाद्या आनंददायक घटनेने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रवास, एखादी मोठी खरेदी वगैरे घडू शकतात. राशीत राहू असल्याने मात्र कुणाला उधार, उसनवारी पैसे देण्याचा प्रसंग आल्यास सावध निर्णय घ्यायला हवा. गुंतवणूक सध्या टाळावी. हा आठवडा तसा विविध समारंभात सहभाग, भ्रमंती यात उत्साहात पार पडू शकतो. नोकरी-व्यवसायात सहकार्‍यांशी वादविवाद उद्भवण्याची शक्यता आहे. विरोधकांपासूनही सावध असावे. विद्यार्थ्यांना अधिक मेहनत आवश्यक.
शुभ दिनांक- 24,27,1,2.
िंसह- यशाची कमान उंचावणार
या आठवड्याच्या सुरुवातीस चंद्राचे भ्रमण आपल्या पराक्रम स्थानातून होत आहे. राशीस्वामी रवीशी त्याचा शुभ योग झाला आहे. त्यामुळे या आठवड्यात आपल्या सर्वप्रकारच्या प्रयत्नांना उत्तम बळ मिळताना दिसेल. नोकरी-व्यवसायातील कामाचे कौतुक होईल. व्यवसायात आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. आपल्या संततीस देखील या आठवड्यात काही लक्षणीय यश लाभू शकेल. यशाची कमान उंचावेल. तथापि मनावर संयम ठेवावयास हवा. नव्या योजना पुरेशी खबरदारी घेऊन सुरू करावयास हरकत नाही. गुंतवणूक तूर्त टाळावी. विरोधकांच्या कारवायांवर लक्ष ठेवावे. विद्यार्थीवर्गास आठवडा उत्तम ठरावा.
शुभ दिनांक- 24,25,1,2.
कन्या- कार्यक्षेत्रात महत्त्वपूर्ण घडामोडी
या आठवड्याच्या सुरुवातीस चंद्राचे भ्रमण आपल्या धन स्थानातून होत आहे. राशीस्वामी बुधाशीही त्याचा शुभयोग झाला आहे. त्यामुळे या आठवड्यात आपल्या व्यवसाय िंकवा नोकरीच्या ठिकाणी काही महत्त्वपूर्ण घडामोडी संभवतात. काही अपेक्षित बदल आनंददायक ठरावेत. जबाबदारीने सोपविलेले काम पूर्ण करून दाखवाल. आपली आर्थिक आवक देखील वाढेल. काही युवकांना व्यावसायिक वाटचाल सुरू करण्यास उत्तम संधी लाभू शकेल. विवाहादी कार्याच्या दृष्टीने योग चालून येतील. लाभातील राहू प्रलोभनांच्या मागे धावू नका असे सुचवीत आहे. कुटुंबात समाधान. विद्यार्थीवर्गाला उपयुक्त काळ.
शुभ दिनांक- 26,27,28,1.
तूळ- उत्साह व समाधान लाभेल
या आठवड्याच्या सुरुवातीस चंद्राचे भ्रमण आपल्या राशीस्थानातून होत आहे. सोबतच त्याचा राशीस्वामी शुक्रासोबत लाभयोग झालेला आहे. त्यामुळे हा आठवडा आपणास व कुटुंबास प्रामुख्याने आनंदमय व कामात यश प्रदान करणारा राहील. छोट्या छोट्या कामातूनही आपला उत्साह व समाधान दृष्टिगोचर होत राहील. कार्यक्षेत्रात मात्र सहकार्‍यांशी गोड बोलून काम काढून घेण्याचे तंत्र अवलंबावे लागेल. मित्र परिवार वा भाऊबंदकीत काही वाद निर्माण होणार नाही, याची काळजी घ्या. युवा वर्गास चांगल्या संधी लाभू शकतील. प्रवासाचे योग संभवतात. विद्यार्थीवर्गास उत्तम काळ आहे.
शुभ दिनांक- 24,25,1,2.
वृश्चिक- जोखीम पत्करणे धोक्याचे
या आठवड्याच्या प्रारंभी चंद्राचे भ्रमण व्यय स्थानातून होत आहे, राशीस्वामी मंगळाशी त्याचा प्रतियोग झालेला असल्यामुळे हा आठवडा आपणास काहीसा कष्टप्रद व मनाविरुद्ध घटनांनी युक्त ठरू शकतो. याकाळात प्रकृतीची देखील काळजी घेतली पाहिजे. साडेसातीमुळे निर्माण झालेली बोच देखील जाणवणार. हे सारे पाहता क्षमतेपेक्षा मोठी उडी मारू नका. जोखीम पत्करणे धोक्याचे राहील. सावध पवित्रा असावा. कार्यक्षेत्रातील वातावरण जरा युक्तिनेच सांभाळावे. खर्चावर नियंत्रण हवे. कुटुंबातून सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांना परीक्षेतील यशासाठी जोमाने प्रयत्न करावे लागतील.
शुभ दिनांक- 24,25,28,2.
धनू- आर्थिक लाभ वाढणार
या आठवड्याच्या प्रारंभी चंद्राचे भ्रमण आपल्या लाभ स्थानातून होत आहे, त्यामुळे हा आठवडा आपणास आर्थिक लाभाचा व महत्त्व वाढीस लावणारा ठरू शकतो. जोडीदाराकडून तसेच व्यावसायिक भागीदाराकडून उत्तम प्रतिसाद, हे या आठवड्याचे मुख्य फलित ठरावे. आपल्या योजनांना बळ मिळेल. काही धाडसी निर्णय घेण्यास हरकत नाही. त्वरित लाभ दिसला नाही तरी त्याची उत्तम फले सावकाश हाती येतील. युवावर्गास कार्यक्षेत्रात चांगल्या संधी लाभतील. दरम्यान, आकस्मिक खर्चांना देखील तोंड द्यावे लागू शकते. कुटुंबातून सहकार्य मिळेल. विवाहादी योग यावेत. विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तम यश मिळावे.
शुभ दिनांक- 24,26,28,2.
मकर- उपयुक्त संधी लाभतील
या आठवड्याच्या प्रारंभी चंद्राचे भ्रमण आपल्या दशम या कर्म स्थानातून होत आहे, शिवाय राशीस्वामी शनीशी त्याचा लाभ योग झाला आहे. त्यामुळे हा आठवडा व्यावसायिक लाभासाठी उत्तम राहील. आपला अर्थत्रिकोण सक्रिय होत असल्याने नोकरी-व्यवसायात चांगले यश मिळावे. नोकरीसाठी प्रयत्नशील युवा वर्गास उपयुक्त संधी लाभू शकतील. आर्थिक आवक देखील वाढेल. प्रकृतीची कुरबूर असलेल्यांना जरूर दिलासा मिळेल. कुटुंबातून तसेच कार्यक्षेत्रात सहकारी वर्गाकडून अपेक्षित मदत मिळावी. मात्र स्वभावात मृदुपणा बाणावा लागेल. बोलून श्रेय गमावू नका. विद्यार्थी वर्गास उत्तम योग.
शुभ दिनांक- 24,25,26,2.
कुंभ- योजनांना निश्चित दिशा
या आठवड्याच्या प्रारंभी चंद्राचे भ्रमण आपल्या भाग्य या शुभ स्थानातून होत आहे, शिवाय त्याचा राशीस्वामी शनीशी लाभ योग देखील झालेला आहे. त्यामुळे हा आठवडा आपणास सर्वतोपरि उत्तम जावा. अगोदर केलेल्या काही कार्याचा लाभ मिळू शकतो. आर्थिक फायदाही मिळणार. मुलांकडून अपेक्षित बातम्या कळू शकतात. त्यांचे यश निश्चितपणे सुखावून जाईल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. प्रवासाच्या योजना आखल्या जातील. विशेषतः शिक्षणासाठी बाहेर जाऊ इच्छिणार्‍यांच्या योजनांना दिशा मिळेल. कलाक्षेत्रातील मंडळींना आठवडा उत्तम जावा. विद्यार्थीवर्गाला परीक्षेत मोठे यश मिळवता येईल.
शुभ दिनांक- 25,27,1,2.
मीन- व्यवसायात तंगी व मंदी
या आठवड्याच्या प्रारंभी चंद्राचे भ्रमण आपल्या अष्टम या त्रासदायक स्थानातून सुरू होत आहे, शिवाय राशीस्वामी गुरूच्या व्ययात तो असल्याने हा आठवडा काहीशा विपरीत स्थितीतच सुरू होईल असे दिसते. व्यवसायात तंगी व मंदी जाणवेल. नोकरीत काहीसा तणाव वाढेल. अधिकारी वर्गाची आपल्याला जुळवून घ्यावे लागेल. कुटुंबातून मात्र आपणास उत्तम साथ मिळेल. वडीलधार्‍या मंडळींचा सल्ला उपयुक्त ठरेल. सावधगिरी म्हणून नवीन कोणताही उपक्रम तूर्त सुरू करू नये. आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये. वाहने सांभाळून चालवावीत. खर्च आवरा. विद्यार्थ्यांना अधिक परिश्रम घ्यावे लागतील.
शुभ दिनांक- 26,27,28,1.
।। इति शुभम्‌ ।।
- मिलिन्द माधव ठेंगडी (ज्योतिष शास्त्री)
भ्रमणसंवादी ः 8600105746
--------------------