प्रगट दिनासाठी लाखोंच्या संख्येने भक्त शेगावात दाखल
   दिनांक :24-Feb-2019
लाखोंच्या संख्येने भक्त शेगावात दाखल  
शेगाव : विदर्भाची पांढरी असलेल्या शेगावात संत श्री गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्य लाखोंच्या संख्येने भक्त शेगावात दाखल झाले आहेत. महाराजांच्या समाधी स्थळासह संपूर्ण शहर आकर्षक रोषणाईने सजविण्यात आले आहे. उद्या २५ तारखेला जरी प्रगट दिन असला तरी  २० फेब्रुवारी पासून हा उत्सव सुरू झाला आहे. २५ फेब्रुवारीपर्यंत धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन संस्थानातर्फे करण्यात आले आहे. यामध्ये दररोज मंदिरात सकाळी ५ ते ६ वाजेपर्यंत काकडा आरती, सकाळी ७.१५ ते ९ पर्यंत भजन आणि सायंकाळी ५.१५ ते ६ वाजेपर्यंत हरिपाठ व रात्री ८ ते १० वाजेपर्यंत किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. उद्या प्रगट दिनानिमित्य श्रींच्या पालकीचे गजा-अश्वांसह नगर परिक्रमा करण्यात येईल.