राज्यातील साडे चार हजार इंग्रजी शाळा उद्या बंद
   दिनांक :24-Feb-2019

 
 
राज्यभरातील इंग्रजी शाळा उद्या (25 फेब्रुवारी) बंद राहणार आहेत. आरटीईअंतर्गत प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांची शुल्क प्रतिपूर्ती तातडीने द्यावी आणि इतर मागणीसाठी इंडिपेंडन्ट इंग्लिश स्कूल असोसिएशनने (ईसा) हा निर्णय घेतला आहे. या बंदमध्ये 29 जिल्ह्यातील साडे चार हजार इंग्रजी शाळा सहभागी होणार आहेत. तसेच या बंदला मुंबई स्कूल बस असोशिएशननेही पाठिंबा दिला आहे. मुंबईतील 140 शाळांच्या स्कूल बस सेवा बंद राहणार आहेत. मात्र ज्या इंग्रजी शाळांमध्ये प्रात्यक्षिक किंवा तोंडी परीक्षा आहेत, त्या शाळा बंदमधून वगळल्याचे ईसाने सांगितले .