मेस्सीची ५०वी हॅट्‌ट्रिक
   दिनांक :24-Feb-2019
बार्सिलोना,
लियोनेल मेस्सीने कारकीर्दीतली दणदणीत ५०वी हॅट्‌ट्रिक साजरी केली. मेस्सीच्या या शानदार हॅट्‌ट्रिकच्या बळावर बार्सिलोनाने सेव्हिल्लावर ४-२ अशा गोलफरकाने विजय नोंदविला. या विजयाबरोबरच बार्सिलोना ला लीगा फुटबॉल स्पर्धेच्या विजेतेपदाच्या समीप पोहोचला आहे.
 
 
मेस्सीची फिटनेस उत्तम नाही व बार्सिलोनाचा संघसुद्धा फॉर्मसाठी संघर्ष करत आहे, असे मानले जायचे, परंतु या दोन्ही गोष्टींची तमा न बाळगता मेस्सी व बार्सिलोनाने रामोन सांचेझ पिंज्युआन येथे उत्स्फूर्त खेळाचे प्रदर्शन केले. बार्सिलोनाला अजून रियाल माद्रिदसोबत दोन सामने खेळावयाचे आहे. नऊ सामन्यात ११ गोलची नोंद केल्यानंतर मेस्सीच्या मांडीला दुखापत झाली होती.