समुद्रपूर पोलिसांचा शहिदांच्या कुटुंबियांना मदतीचा हात
   दिनांक :24-Feb-2019
 
समुद्रपूर : पुलवामा दहशदवादी हल्ल्यात शाहिद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना समुद्रपूर पोलीस ठाण्याच्या वतीने आर्थिक मदतीचा हात देण्यात आला. एरवी पोलीस म्हंटले की त्यांच्याकडे नाकारात्मक दृष्टिकोनातून पहिल्या जाते, परंतु समुद्रपूर पोलिसांनी कर्मचाऱ्यांच्या सहभागातून निधी जमा करून १ लाख १ हजारांची मदत शहिदांच्या कुटुंबियांना केली. पोलिसांच्या या उपक्रमाची परिसरात कौतुक होत आहे.   समुद्रपूर पोलीस स्थानकाचे ठाणेदार प्रवीण मुंडे, ३ पीएसआय आणि ४३ कर्मचारी असे एकूण ४७ जणांनी आपापल्या परीने खारीचा वाटा उचलत १ लाख १ हजाराचा निधी जमा केला. सर्वांनी आपला खारीचा वाटा उचलला आणि बघता बघता १ लाख जमा झाल्याने ही मदत करू शकलो. याचा आनंद असल्याचे मत ठाणेदार प्रवीण मुंडे यांनी व्यक्त केले.