अमरावती जिल्हा शिवसेना अध्यक्षपदी श्याम देशमुख यांची नियुक्ती
   दिनांक :24-Feb-2019
 
 
 
अमरावती : माजी आमदार संजय बंड यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या शिवसेनेच्या अमरावती जिल्हाध्यक्षपदी श्याम देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्याम देशमुख हे शहर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत. जिल्ह्यातील तिवसा, मोर्शी आणि धामणगाव रेल्वे या तीन विधानसभा मतदार संघाची जबाबदारी श्याम देशमुख यांच्यावर सोपविण्यात आली आहे. यापूर्वी शिवसेनेत तालुका प्रमुख आणि उपजिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. 
 
संजय बंड यांच्या संस्कारात वाढलेल्या शिवसैनिकांपैकी मी असून येणाऱ्या काळात सामाजिक प्रश्नांवर शिवसेनेची आक्रमक भूमिका जिल्ह्यात पाहायला मिळेल. भाजपसोबत युती करण्याचा उद्धव ठाकरे यांनी घेतलेला निर्णय योग्य असून दोन्ही पक्ष हे हिंदुत्ववादी विचारांचे आहे. येणाऱ्या काळात राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल, अशी प्रतिक्रिया श्याम देशमुख  दिली आहे.