' नोटबुक ' चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित
   दिनांक :24-Feb-2019
 सलमान खान निर्मित ‘नोटबुक’ या चित्रपटातून  मोहनिश बहलची मुलगी प्रनूतन बहल आणि जहीर इक्बाल हे दोन नवे चेहरे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.  प्रनूतन आणि जहीर यांच्या अभिनयाने सजलेला ‘नोटबुक’ हा सिनेमा येत्या २९ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या ट्रेलरला लोकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे.
 
 
 
 सलमानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर हा ट्रेलर शेअर केला असून २९ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याची माहिती सुद्धा त्याने दिली. कधीही एकमेकांना न भेटलेल्या पण प्रेमात पडलेल्या जोडप्याची कथा तुम्हाला चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे अधिकाधिक चित्रीकरण हे काश्मिरमध्ये झाले आहे.  या चित्रपटाची निर्मिती सलमान खानने केली असून या चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कक्करने केले आहे.