परीक्षेसाठी चाललेल्या विद्यार्थ्यांवर काळाचा घात
   दिनांक :25-Feb-2019
धारणी,
इयत्ता बारावीचा पेपर देण्यासाठी परीक्षा केंद्रावर जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी १० वाजता दिया फाट्यावर घडली.
 
 
 
आदित्य उर्फ भुरू प्रकाश नायडे रा. दिया असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. १२ वीची पेपर देण्यासाठी आदित्य परीक्षा केंद्राकडे निघाला होता. मार्गतल्या धारणी - दिया फाटयावर त्याच्या अंगावरून ट्रॅक्टरचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यु झाली. सदर विद्यार्थ्यांचा धारणी जिल्हा परिषद हाईस्कूल परीक्षा केंद्रावर पेपर होता. घटना घडताच घटनास्थळावरच्या नागरिकांनी पोलिसांना सूचना दिली. धारणी पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे.