मॅन्चेस्टर सिटीला सलग दुसर्‍यांदा ईएफएल चषक
   दिनांक :25-Feb-2019
लंडन,
रोमांचक ठरलेल्या निर्णायक सामन्यात मॅन्चेस्टर सिटीने पेनॉल्टी शूटआऊटमध्ये चेल्सी संघाला ४-३ अशी धूळ करत सलग दुसर्‍यांदा ईएफएल चषक पटकावले. गतवर्षीसुद्धा मॅन्चेस्टर सिटीने आर्सेनलला हरवून या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. चेल्सीविरुद्धचा मॅन्चेस्टर सिटीचा हा निर्णायक सामना निर्धारित वेळे व अतिरिक्त वेळेतही गोलशून्यने बरोबरीत राहिला, अखेर सामना निकाली लावण्यासाठी पेनॉल्टी शूटआऊटचा अवलंब करण्यात आहे.
 

 
 
मॅन्चेस्टर सिटीने सामन्याच्या प्रारंभी चेंडूवर नियंत्रण राखण्यात विश्वास मानला, परंतु चेल्साच्या खेळाडूंनी सुरेख बचावात्मक खेळ करत मॅन्चेस्टरचे मनसुबे उधळून लावले. चेल्सीने एक-दोन वेळा जोरदार आक‘मण सुद्धा केले, परंतु ते सर्व निष्प्रभ ठरले. त्यानंतरही चेल्सीने पेप ग्वार्डियेलाच्या संघाला आघाडी मिळवू दिली नाही. उत्तरार्धातही जोरदार संघर्ष झाला, परंतु कोणालाही गोल नोंदवता आला नाही. अखेर पेनॉल्टी किकमध्ये मॅन्चेस्टर सिटीने बाजी मारली.