शिक्षणासह राष्ट्रभक्ती पुरक उपक्रमाची आवश्यकता
   दिनांक :25-Feb-2019
-संजय नाकाडे यांचे प्रतिपादन
-ब्रम्हपुरी येथे विद्या भारतीची प्रांत बैठक
 

 

ब्रम्हपुरी,
आज शिक्षणासोबतच चारित्र्य निर्मिती, संस्कार, राष्ट्रभक्ती व अनेक पुरक उपक्रम राबविण्याची आवश्यकता आहे. संपर्क-संवाद आणि समन्वय या त्रयींतून विद्याभारतीचे कार्यकर्ते हे कार्य समोर नेतील, असा आशावाद विद्या भारतीचे प्रांत सहमंत्री संजय नाकाडे यांनी व्यक्त केला.
 
शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेली भारतातील सर्वात मोठी स्वयंसेवी संघटना असलेल्या विद्याभारतीची विदर्भ प्रांत बैठक येथील हिंदू ज्ञान मंदिरात २३ व २४ फेब्रुवारीला पार पडली. या बैठकीच्या उद्घाटन सत्रात ते मार्गदर्शन करीत होते.
या बैठकीच्या एकूण ६ सत्रात पालक प्रबोधन, मुख्याध्यापक, आर्चाय प्रशिक्षण, बालिका प्रबोधन, समुहगान, संस्कृत भाषा, खेलकूद आदी विषयांवर चर्चा होऊन आगामी सत्रात शाळांशी संवाद साधण्याचे निश्चित करण्यात आले. यावेळी नाकाडे यांनी, प्राचीन काळातील शिक्षण पध्दती व आजची प्रचलित शिक्षणपध्दती यांचा तुलनात्मक आढावा घेतला.
 

 
 
प्रांतातील ५० कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते. बैठकीत प्रांताध्यक्ष रमेश धारकर, मंत्री सतीश खोत, संघटक शैलेश जोशी, संजय नाकाडे आणि क्षेत्रीय संघटक श्रीकांत देशपांडे यांचेही मार्गदर्शन लाभले. रंजन कस्तुरकर, रवी पेशट्टीवार यांनी वैयक्तिक गीत, तर दिपाली देऊरकर, प्राजक्ता चिंचाळकर, शरयू काळे यांनी वंदना सादर केली. जिल्हा प्रमुख-सह प्रमुख साकेत भानारकर व विकास हटवादे यांच्या मार्गदर्शनात प्रमोद दिघोरे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण व्यवस्था सांभाळली. शैलेश जोशी यांनी समारोपीय मनोगत व्यक्त केले.