राशिद खानची हॅट्‌ट्रिक
   दिनांक :25-Feb-2019
- अफगानिस्तानची ३-० ने क्लीन स्विप

 
डेहरादून,
अष्टपैलू मोहम्मद नबीच्या तडाखेबंद ८१ धावा व लेग स्पिनर राशिद खानच्या हॅट्‌ट्रिकसह ५ बळींच्या जोरावर अफगानिस्तानने आयर्लंडवर तिसर्‍या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात ३२ धावांनी विजय मिळविला. या विजयाबरोबरच तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत अफगानिस्तानने आयर्लंडला ३-० ने क्लीन स्विप केले.
  
प्रथम फलंदाजी करत अफगानिस्तानने ७ बाद २१० धावा काढल्या. नबीने ३६ चेंडूंच्या खेळीत ६ चौकार व ७ षटकार हाणले. गत सामन्यात नाबाद १६२ धावांची खेळी करणार्‍या हजरतुल्लाह जजाईने ३१ धावांची भर घातली. आयर्लंडकडून वायद रॅनकिनने ३ बळी टिपले. आयर्लंडचा संघ ८ बाद १७८ धावाच काढू शकला. राशिद खानने सामन्याच्या १६ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर आयर्लंडकडून सर्वाधिक धावा काढणार्‍या केव्हिन ओ ब्रायनला बाद केले. ओ ब्रायनने ४७ चेंडूत ७४ धावा ठोकल्या. राशिद खानने लागोपाठ चार चेंडूत चार बळी टिपले.