नीचपणाचा कळस!
   दिनांक :25-Feb-2019
एखाद्या नेत्याने आणि त्यातही कॉंग्रेससारख्या पक्षाच्या अध्यक्षाने किती खोटेपणा करायचा, याला काही मर्यादा? पण, राहुल गांधी यांनी खोटेपणाचा कळस गाठला. पुलवामा हल्ल्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तब्बल तीन तासपर्यंत आपल्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते, असा आरोप करून आपल्या अकलेचे दिवाळे निघाल्याचे जगजाहीर केले. किती हा नीचपणा? आपण कुणाविषयी बोलतो, आपली औकात काय? याचा तसूभरही विचार न करता नेहमीप्रमाणे त्यांनी मोदींवर आरोप ठोकून दिला. कुठलीही शहानिशा न करता, पंतप्रधानांवर असा खोटा आरोप करून शेवटी त्यांनी शेण खाल्लेच. अलीकडे काही वाहिन्या आणि तथाकथित वेब पेज चालविणार्‍यांना राहुल गांधींने मोदींविरोधात सुपारी दिली आहे. ते सुद्धा जगजाहीर आहे. पण, पंतप्रधानांविषयी खोटेपणा करून बदनामी? देशातील जनता हे कसे सहन करणार आहे. ज्या जनतेने मोदींना पंतप्रधान बनविले, त्यांच्याबाबत कोणताही राष्ट्रवादी विचारसरणीचा माणूस खोेटेपणा मुळीच सहन करणार नाही, हे राहुलने पक्के ध्यानात ठेवावे. राजकारणात, निवडणुकीच्या वेळी एक पक्ष दुसर्‍यावर टीका टिप्पणी करीत असतात, उणीदुणी काढत असतात हे मान्य. राजकीय पक्ष म्हणून त्यांचे ते कामच आहे. पण चक्क खोटेपणा आणि बदनामी आणि ती सुद्धा पंतप्रधानांची. हरामखोरीची हद्द झाली. देशातील कोणताही नागरिक, अगदी विरोधक सुद्धा पुलवामात एवढा मोठा हल्ला झाल्यानंतर मोदी तीन तास शूटिंगमध्ये रमलेले असतील, यावर विश्वासच ठेवणार नाहीत.
 
काय म्हणाले राहुल गांधी? पुलवामात दुपारी ३.१० वाजता हल्ला झाला आणि त्याकडे दुर्लक्ष करून मोदी उत्तराखंडमधील कारबेट पार्कमध्ये आपल्या शूटिंगमध्ये गर्क होते. त्यांनी या काळात समोसा खाल्ला, चहा घेतला. आपल्या शहीद जवानांचे हौतात्म्य होत असताना, त्याकडे मोदींनी दुर्लक्ष केले आणि शूटिंग करीत राहिले. राहुलने शूटिंग होत असतानाचे फोटोही दाखवले आणि हे वृत्त आलेल्या एका वेबसाईटचा कागद दाखविला. उत्तराखंडमध्ये कॉंग्रेसचे अनेक नेते आहेत. त्यांच्याशी संपर्क साधून सत्य शोधण्याची त्यांनी तसदी घेतली नाही. कारण, त्यांचा नीच उद्देश वेगळाच होता. सत्य काय आहे? पुलवामा हल्ला झाला, तीन वाजून ३३ मिनिटांनी. तत्पूर्वी दुपारी दोन वाजेपर्यंत मोदी हे कारबेट पार्कमध्ये होते व सिनेमाची शूटिंग करीत नव्हते, तर डिस्कव्हरी चॅनेलसाठी पर्यटन प्रोत्साहन आणि हवामानबदलावरील एका वृत्तपटासाठी आपले मनोगत व्यक्त करीत होते.
 
 
 
कार्बेट पार्कमध्ये डिस्कव्हरीचे शूटिंग, नौकानयन हा सर्व कार्यक्रम अवघ्या २५ मिनिटात संपला. दोन-सव्वादोनच्या सुमारास ते तेथून निघून नियोजित कार्यक्रमानुसार दुपारी ४ वाजता रुद्रपूर येथील जाहीर सभेला संबोधित करणार होते. पण, वाईट हवामानामुळे ते कारने रुद्रपूरला पोहोचले. चार वाजताच्या सुमारास त्यांना पुलवामा हल्ल्याची सूचना मिळाली. कारमधून आणि नंतर रुद्रपूर येथून त्यांनी ताबडतोब राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, गृहमंत्री राजनाथ सिंह आणि जम्मू-काश्मिरच्या राज्यपालांकडून माहिती घेणे सुरू केले. रुद्रपूरच्या सभेला खूप लोक होते म्हणून त्यांनी टेलिफोनवरून पाच मिनिटे मनोगत व्यक्त केले. तेथून ते थेट दिल्लीला पोचले.
 
जो फोटो दिवट्या राहुलने दाखविला, तो फोटो घेणारे विश्वकेतू वैद्य यांनी दुपारी १ वाजून ५२ मिनिटांनी ट्विटरवर टाकला. राहुल म्हणाले की, हा फोटो सायंकाळचा आहे, ते सर्वस्वी खोटे निघाले. हा फोटो पुलवामा हल्ला होण्याच्या पूर्वीचा आहे. हल्ला झाल्यानंतर प्रारंभी ज्या बातम्या येत होत्या व त्यावेळी एवढे जवान शहीद होण्याचे वृत्त आले नव्हते. याचा अर्थ स्पष्ट आहे. केंद्रीय राखीव पोलिस दलाने म्हटले आहे की, जम्मू ट्रांझिट कॅम्पमधून हा ७८ वाहनांचा काफिला पहाटे साडेतीन वाजता निघाला. दुपारी साडेतीनच्या सुमारास या काफिल्यावर अवंतीपुरा येथे आत्मघाती हल्ला झाला. हा सारा घटनाक्रम सूर्यप्रकाशाएवढा स्वच्छ असताना, राहुल गांधींनी मात्र पंतप्रधानांवर खोटे आरोप केले. एक बाब येथे लक्षात घेण्यासारखी आहे की, आतापर्यंत जेवढे आरोप राहुलने केले, ते आपल्या सुपारी दिलेल्या वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातम्या, वाहिन्या किंवा वेब न्यूजमध्ये छापून आलेल्या वृत्तांच्या आधारे केले आहेत. एवढा बेजबाबदारपणा आणखी दुसर्‍या कोणत्या पक्षाने दाखविलेला नाही. रणजित सुरजेवालासारख्या चिल्लर नेत्याची गोष्ट वेगळी आहे. पण, एका राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षाने केलेले आरोप हे गांभीर्याने घेण्याची बाब असते. राहुलने हे गांभीर्य यापूर्वीही गमावले आहे आणि आता तर त्यांनी खोटेपणाचा कळसच गाठलेला आहे. मोदी सरकारच्या नेत्रदीपक कामगिरीमुळे त्यांच्यात घबराट पसरली आहे. केवळ राफेलबाबत ते बोलत फिरत आहेत. त्या प्रकरणातही त्यांची हवा निघून गेली आहे.
 
मोदींना सत्तेवर येण्यापासून रोखण्यासाठी राहुल गांधी पाकिस्तानची मदत घेत आहेत का? असा वास आता येत आहे. कॉंग्रेसचा एक नेता मणिशंकर अय्यर हा पाकिस्तानात जाऊन बरळला होता की, पहले ये मोदी को हटाओ, त्यानंतर प्रचंड वादळ उठले होते. मणिशंकरला कॉंग्रेसमधून काढा अशी मागणी त्यांच्याच पक्षातून होत होती. पण, कॉंग्रेसने त्याला फक्त निलंबित केले आणि नंतर मोठ्या सन्मानाने त्याला परत पक्षात घेतले. पुलवामा हल्ल्याचे तार राहुल गांधी यांचे खोटे आरोप आणि मणिशंकरने पाकिस्तानात केलेले विधान याच्याशी मेळ खात आहेत. तुम्ही भारतात हल्ले करा, आम्ही मोदींवर टीका करू असे हे कटकारस्थान असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्जिकल स्ट्राईकच्या वेळीही सरकारला बदनाम करण्यासाठी राहुल गांधींनी पुरावे मागितले होते. हे करून राहुलने समस्त लष्कराच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. गेल्या दोन वर्षांतील घटनाक्रम पाहता कॉंग्रेस सत्तेसाठी पाकिस्तानची छुपी मदत घेत असून आपल्या 45 जवानांच्या बलिदानाला कॉंग्रेस पक्षच जबाबदार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. आधी संंरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत मणिशंकरच्या पाकिस्तानातील विधानाचा उल्लेख केला होता.
 
आता राजस्थानमधील सभेत पंतप्रधानांनीही त्याचा पुनरुच्चार केला. याचा अर्थ राहुल, मणिशंकर आणि पाकिस्तान यांच्यात संबंध असल्याचे स्पष्ट दिसत आहे. पुलवामा हल्ल्यानंतर राहुल गांधी ज्याप्रमाणे वागत आहेत आणि मोदींवर खोटेनाटे आरोप करीत आहेत, त्यावरून राहुल-पाक छुप्या संबंधांना बळकटीच मिळत आहे. सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागून राहुलने तेव्हाही नालायकीचा कळस गाठला होता. आता त्याच राहुलने सर्जिकल स्ट्राईकचे नेतृत्व करणारे लेफ्टनंट जनरल डी. एस. हुडा यांना सुरक्षा धोरणाचा दस्तावेज तयार करण्याची जबाबदारी सोपविली आहे. हा निर्णय घेत असताना, आधी राहुल गांधींनी देशाची माफी मागायला हवी होती. सर्जिकल स्ट्राईक खरे होते, आम्ही पुरावे मागून चूक केली अशी जाहीर माफी मागितली पाहिजे. राहुल गांधींकडून अशी माफी अजून आलेली नाही. भारत तेेरे टुकडे होंगे, अशा घोषणा देणार्‍या देशद्रोह्यांच्या समर्थनार्थ जेएनयुमध्ये जाऊन, मै आपके साथ हूं, असे बोलणार्‍या या नेत्याकडून माफीची अपेक्षा करणेच चूक आहे. आचार्य अत्रे असते तर त्यांनी म्हटले असते, गेल्या दहा वर्षांत एवढा नालायक नेता आजपर्यंत झाला नाही...