ट्रॅव्हल्स-दुचाकीचा भीषण अपघात; दोन ठार
   दिनांक :25-Feb-2019
-चितेगावजवळील घटना
मूल,
मूल-सिंदेवाही मार्गावरील चितेगावजवळ एका भरधाव ट्रॅव्हल्सने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन युवकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना आज सोमवारी सकाळी ७ वाजता घडली. प्रकाश धंदरे व होमराज शिडाम अशी मृतकांची नावे आहेत.
 
 
 
ब्रम्हपुरी तालुक्यातील एकरा भूज येथील रमेश धंदरे व होमराज शिडाम हे दोघे दुचाकीने गावावरून मूलकडे येत होते. यावेळी अंजनी ट्रॅव्हल्स क्रमांक एमएच-३४ बीडी २४०७ ही प्रवाशांना घेऊन नागपूरकडे जात होती. दरम्यान, मूल-सिंदेवाही मार्गावरील चितेगावजवळ ट्रॅव्हल्सने विरूध्ददिशेने येणार्‍या दुचाकीला जोरदार धडक दिली. घटनेची माहिती मिळताच मूल पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. याप्रकरणी ट्रॅव्हल्स चालकाला पोलिसांनी अटक केली असून, घटनेचा पुढील तपास ठाणेदार मुरलीधर कासार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शेंडे करीत आहेत.