भारतातील टॉप कंपन्यांचे मालक व्हा!
   दिनांक :25-Feb-2019
उद्योगांचे सरकारीकरण करा’ साम्यवादी नेते म्हणतात. ‘उद्योगांचे खाजगीकरण करा’ पुंजीवादी नेते म्हणतात. ‘उद्योगांचे जनताकरण करा’ ज्ञानयुगीन नेते म्हणतात. सरकारीकरण म्हणजे नॅशनलीझेशन, खाजगीकरण म्हणजे प्रायव्हेटीझेशन आणि जनताकरण म्हणजे पिपलायझेशन. कम्युनिस्ट नेत्यांनी औद्यागिकीकरण करून रशियाला बलाढ्य केले, माहिती तंत्रज्ञान क्रांतीने चीनला महाबलाढ्य केले, तर बंगालला मागासलेले ठेवले. कॉंग्रेस नेत्यांनी सत्तादलाली करून, उद्योगपतीना बदनाम करून, गलीच्छ राजकारण करून भारताच्या विकासाचा वेगच मंदावला. स्पष्ट बोलायचे तर ‘राहूल-रॉबर्ट’ पेक्षा ‘अंबानी बंधू’ राष्ट्र विकासात तर ‘राहुल-रॉबर्ट’ पेक्षा ‘अंबानी बंधू’ राष्ट्र विकासात श्रेष्ठ आहे. लालू फॅमिली पेक्षा अंबानी-अडाणी-मिंहद-टाटा-बिर्ला-बजाज फॅमिली राष्ट्रासाठी बेस्ट आहेत. भ्रष्ट राजनेत्यांना भारतरत्न न देता उद्योगी नेत्यांना दिली पाहिजेत.
 
एक म्यु. फंडस्कीम सुमारे ४० कंपन्यांचे शेअर्स म्हणजे मालकी हक्क विकत घेते. म्यु. फंड युनिट होल्डर ४० कंपन्यांचा भागीदार होतो. मागील २० वर्षांत भारतीय म्यु. फंडस्कीम्सने सरासरी १८ ते २० टक्के नफा मिळविला, कारण की स्टॉक एक्सचेंज लीस्टेड ५००० ते ६००० भारतीय कंपन्यांनी १६ ते २० प्रतिशतने कंपन्यांचे  ॲसेट्‌स वाढविलेत. भारताची महागाई दर गत २० वर्षांत सुमारे ७ टक्के होता, म्हणून बँकेच्या फीक्स्ड डीपॉझिटर्सना ७ टक्के व्याजापोटी मिळाले. बॅकांच्या म्यु. फडांनी गत २० वर्षांत बॅकांहून जास्त लाभ/परतावा वाटला आहे, हे चाणाक्षांनी लक्षात ठेवावे.
 
भाजप नेते लेफ्टीस्ट किंवा राईटिस्ट नसून लेफ्ट-राइट करणारे पुढे जाणारे आहेत. नेहरू- गांधी घराणे छुपे साम्यवादी, उद्योजकविरोधी, पॉप्युलिस्ट पॉलिटिक्स करणारे आहेत. नेहरू-गांधी घराणे विदेशी उद्योजकांचे पाठीराखे असून देशी, उद्योगांसाठी विघ्नकर्ते आहेत. मोदी सरकारच्या पावलांमुळे देश विश्वात अग्रेसर झाला आहे. भारतीय शेअर्सहोल्डर्स-युनिटहोल्डर्स-उद्योजक-व्यावसायिक-कृषक-कामगार, इत्यादींचे हीत भारताच्या समृद्धीत आहे, हे लक्षात आणून द्यावेसे वाटते.

 
भारतातील टॉप कंपन्यांचे मालक व्हा!
1) इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. 2) रिलायन्स इंडस्ट्रीज लि. 3) ऑईल नॅचरल गॅस कॉर्पोरेशन 4) स्टेट बँक ऑफ इंडिया 5) टाटा मोटर्स लि. 6) भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. 7) हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. 8) राजेश एक्सपोर्टस लि. 9) टाटा स्टील लि. 10) कोल इंडिया लि. 11) टाटा कन्सलटंसी सर्व्हिसेस लि. 12) लार्सन ॲण्ड टूब्रो लि. 13) हिंदाल्को इंडस्ट्रीज लि. 14) आयसीआयसीआय बँक लि. 15) वेदान्ता लि. 16) एचडीएफसी बँक लि. 17) महिन्द्र ॲण्ड महिन्द्र लि. 18) एनटीपीसी लि. 19) भारती ऐअरटेल लि. 20) मारूती सुझुकी लि. 21) इन्फोसिस लि. 22) एचडीएफसी 23) जेएसडब्ल्यू स्टील लि. 24)  ॲक्सिस बँक लि. 25) स्टील ॲथॉरिटी ऑफ इंडिया लि. 26) पंजाब नॅशनल बँक 27) ग्रासिम इंडस्ट्रीज लि. 28) विप्रो लि. 29) मदरसन सुमी सिस्टिम्स लि. 30) गेल (इंडिया) लि. 31) बँक ऑफ बरोडा 32) एचसीएल टेक्नॉलॉजिज लि. 33) मंगलोर रिफायनरी ॲण्ड पेट्रोकेमिकल्स 34) कॅनरा बँक 35) आयटीसी लि. 36) बँक ऑफ इंडिया 37) जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया 38) रेिंडगटन (इंडिया) लि. 39) आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनी 40) कोटक महिन्द्र बँक लि. 41) अडाणी एन्टरप्राईजेस लि. 42) युनियन बँक ऑफ इंडिया 43) हिंदुस्थान युनिलिव्हर लि. 44) एसबीआय लाईफ इन्शुरन्स कंपनी लि. 45) टाटा पॉवर कंपनी लि. 46) चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोेरेशन लि. 47) हिरो मोटोकॉर्प लि. 48) एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनी लि. 49) टेक महिन्द्र लि. 50) अल्ट्राटेक सिमेंट लि. 51) पेट्रोनेट एल एनर्जी लि. 52) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. 53) बजाज फिनसर्व्ह लि. 54) आयडीबीआय बँक लि. 55) रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि. 56) अशोक लिलॅन्ड लि. 57) व्हाडाफोन आयडीया लि. 58) भारत हेबी इलेक्ट्रीकल्स लि. 59) जिंदल स्टील ॲण्ड पॉवर लि. 60) पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लि....... ही यादी ५०० कंपन्यांची आहे.