'पीरियड एन्ड ऑफ सेन्टेन्स' या भारतीय माहितीपटाने जिंकला 'ऑस्कर'
   दिनांक :25-Feb-2019
लॉस एंजेलिस,
९१ वा ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळा सध्या येथे सुरु आहे. यात 'पीरियड एन्ड ऑफ सेन्टेन्स' या भारतीय माहितीपटाने (डॉक्टुमेंटरी) 'सर्वोत्कृष्ट लघुपट डॉक्युमेंटरी शॉर्ट सब्जेक्ट'चा ऑस्कर पुरस्कार पटकावला. गुनीत मोंगा ह्या या माहितीपटाचे निर्मात्या आहेत.३० वर्षांनंतर हा पुरस्कार वितरण सोहळा 'विना यजमान' म्हणजेच होस्टलेस सुरू आहे. 
 
 
ऑस्कर अकदमीने पुरस्कार वितरण समारंभासाठी अनेक तारकांना आमंत्रित केले आहे. व्यासपीठावरील सादरकर्त्यांमध्ये शेफ जोस अँड्रेस, दाना कार्व्हे, क्वीन लतिफाह, काँग्रेसमन जॉन लेविस, दिएगो लुना, टॉम मोरेलो, माईक मायर्स, ट्रेव्हॉर नोआह, ॲम्डला स्टेनबर्ग, बार्बरा स्ट्रेसंड आणि सेरेना विल्यम्स यांचा यात समावेश आहे.
या समारंभात उत्कृष्ट सहअभिनेत्री, मेकअप आणि केशरचना, डॉक्युमेंटरी फीचर, वेशभूषा, फिल्म एडिटिंग, प्रो़डक्शन डिझाईन, सिनेमॅटोग्राफी, साऊंड एडिटिंग, साऊंड मिक्सिंग, विदेशी भाषिक चित्रपट, उत्कृष्ट सहअभिनेता, ॲनिमेटेड फीचर फिल्म, लाईव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म, ॲनिमेटेड शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंटरी शॉर्ट सब्जेक्ट, व्हिज्युअल इफेक्टस, ओरिजिनल स्क्रीनप्ले, ॲडॅप्टेड स्क्रीनप्ले, ओरिजिनल स्कोअर, ओरिजिनल साँग, उत्कृष्ट अभिनेता, उत्कृष्ट अभिनेत्री, दिग्दर्शन, उत्कृष्ट चित्रपट आदींमध्ये हे पुरस्कार दिले जाणार आहेत.