लोकसभेच्या दोन जागांसाठी रामदास आठवलेंची मागणी
   दिनांक :25-Feb-2019
मुंबई : महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि सेनेची युती भलेही झाली असेल पण या युतीत रामदास आठवलेंची एकही जागा न सोडल्याने सध्या ते चिंतेत आहेत. लोकसभेसाठी आपल्याला २ जागा द्याव्यात, अशी मागणी आठवलेंनी युतीकडे केली आहे. रिपाइंला निवडणूक चिन्ह मिळवायचे असेल, तर २ खासदार निवडणून येणे आवश्यक आहे. त्यामुळे आम्हाला २ जागा देण्यात याव्या अशी भूमिका आठवलेंनी युती समोर मांडली आहे.

 
युतीवर प्रतिक्रिया देतांना आठवले म्हणाले की, "आम्हाला न विचारता युती झाली असली तरी मी नाराज नाही. युतीत जागा मिळाल्या नसल्या तरी आमचा पाठिंबा युतीला असेल." लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने दक्षिण अथवा ईशान्य मुंबईतील जागा सोडावी. तर भाजपने राज्यात लातूर, मटेक, सोलापूर यापैकी एक जागा आम्हाला सोडावी, अशी मागणी रामदास आठवलेंनी केली आहे.