विश्वास नांगरे-पाटील नाशिकचे नवीन पोलीस आयुक्त
   दिनांक :25-Feb-2019
 
नाशिक : नाशिकचे आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंघल यांची औरंगाबादला बदली करण्यात आल्यानंतर विश्वास नांगरे पाटील यांची  नवीन आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.  . आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बदली करण्यात आल्याची चर्चा आहे. विश्वास नांगरे-पाटील हे एक बेधडक पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जातात. मुंबईवरील २६/११च्या हल्ल्यात त्यांनी विशेष कामगिरी बजावली होती. आतापर्यंत मुंबई, ठाणे ग्रामीण, लातूर, अहमदनगर, पुणे ग्रामीण व कोल्हापूर अशा विविध विभागांत महत्त्वाची पदे सांभाळली आहेत. सध्या राज्यातील एकूण १८ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. संबंधित अधिकार्‍यांना मंत्रालयातून बदलीचा आदेशही जारी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.