आंजी मोठी गावात सिलेंडरचा स्फोट
   दिनांक :26-Feb-2019
आंजी मोठी,
आज सकाळी ११ ते १२ वाजताच्या दरम्यान बाजार चौक वार्ड क्रमांक २ मध्ये राहत असलेल्या कलावतीबाई रेवतकर यांच्या घरी  सिलेंडरचा स्फोट झाला त्या स्फोटात संपुर्ण घर जळून राख झाले. कलावतीबाई ह्या अंगणवाडीत काम करतात, त्या सकाळी आपली दीनचर्या आटपून अंगणवाडीत कामाकरीता गेल्या होत्या. यानंतर त्यांच्या घराला अचानक आग लागल्याचे समजते.
 
 
 
त्या घरी एकट्याच राहतात. आगीनंतर त्यांच्या घरातील सर्व साहीत्य जळाले आहे. गावात आगीची माहीती  पसरताच गावातील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही तासांनी गावकऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. पुढील तपास खरांगणा पोलिस करीत आहे.