समुद्रपुर पोस्ट ऑफिसमध्ये पिण्याच्या पाण्याचा तुटवडा
   दिनांक :26-Feb-2019
समुद्रपूर,
ग्रामीण भागाचा कणा असलेले उप टपाल घर डिजिटल झाले, पण पोस्ट ऑफिसमध्ये येणाऱ्या ग्राहकांना पिण्याचे पाणीच  उपलब्ध नाही. तसेच, आता उन्हाळ्याची चाहूल लागत असून आगामी काळात आणखी त्रास होण्याची शक्यता आहे.   विशेष लक्ष पुरवून पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. 
 
 
 
समुद्रपूर येथील पोस्ट ऑफिस मूळ बाजारपेठेपासून खूप दूर असल्याने व वस्तीत असल्याने येणाऱ्या ग्राहकाला उन्हाळ्याच्या सुरुवातीस पिण्याचे पाणी मिळत नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे, पोस्ट ऑफिसमधील कर्मचाऱ्यांनाच पाणी पिण्यास मिळत नाही तर खेड्यापाड्यातून येणाऱ्या ग्राहकांना पाणी मिळणे कठीण झाले आहे, याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी