आजचे पंचांग, दिनांक २६ फेब्रुवारी २०१९
   दिनांक :26-Feb-2019
*ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- २६ फेब्रुवारी २०१९*
*धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार*
 
*!!श्री रेणुका प्रसन्न!!*
 
*दिनांक २६ फेब्रुवारी २०१९*
*राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक* फाल्गुन ०७ शके १९४०
*सूर्योदय* -०६:४०
*सूर्यास्त* -१८:१४
 
⭐ *प्रात: संध्या* - स.०५:४८ ते स.०७:०१
⭐ *सायं संध्या* - १८:३५ ते १९:५०
⭐ *अपराण्हकाळ* - १३:५६ ते १६:१५
⭐ *प्रदोषकाळ* - १८:३५ ते २१:०६
⭐ *निशीथ काळ* - २४:२४ ते २५:१४
⭐ *राहु काळ* - १५:४७ ते १७:१५
⭐ *श्राद्धतिथी* - अष्टमी - अष्टका श्राद्ध
 
*सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.*
गुरु मुखात आहुती आहे. 
*कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०९:१९ ते स.११:३८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.* 
 शिववास स्मशानात १०:०३ पर्यंत नंतर गौरीसन्निध,काम्य शिवोपासनेसाठी १०:०३ पर्यंत अशुभ नंतर शुभ दिवस आहे.
 
काय करू नये :
*या दिवशी तिळाचे आवळा व नारळ-खोबरे खावू नये. 
 
काय करावे :
*या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.
 
 *लाभदायक वेळा*
लाभ मुहूर्त-- ११:२१ ते १२:४८
अमृत मुहूर्त-- १२:४८ ते १४:१५
विजय मुहूर्त-- १४:४५ ते १५:३१
पृथ्वीवर अग्निवास-- १०:०३ नंतर.
*पंचांग* 
*शालिवाहन शके* -१९४०
*संवत्सर* - विलंबी
*अयन* - उत्तरायण
*ऋतु* - शिशिर (सौर)
*मास* - माघ
*पक्ष* - कृष्ण
*तिथी* - सप्तमी (१०:०३ पर्यंत)
*वार* - मंगळवार
*नक्षत्र* - अनुराधा
*योग* - व्याघात (१५:३४ नंतर हर्षण)
*करण* - बव (१०:०३ नंतर बालव)
*चंद्र रास* - वृश्चिक
*सूर्य रास* - कुंभ
*गुरु रास* - वृश्चिक
*पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण*
*पं देवव्रत बूट ०९४२२८०६६१७*
*विशेष* - *कालाष्टमी,श्री गजानन महाराज प्रकट दिन (शेगांव)* ,अमृतयोग १०:०३ पर्यंत नंतर सिद्धियोग
 या दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण घालून स्नान करावे.
 मंगलचंडिका स्तोत्राचे पठण करावे.
"कें केतवे नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
 गणपतीला गूळ-खोब-याचा नैवेद्य दाखवावा.
 सत्पात्री व्यक्तिस मसूर दान करावे.
 
 *दिशाशूल* 
उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना गूळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
 
 *चंद्रबळ* : वृषभ,मिथुन,कन्या,वृश्चिक,मकर,कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.*
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.