विश्वविजेता कार्लसन कोलकात्यात खेळणार
   दिनांक :26-Feb-2019
कोलकाता,
प्रथम विश्वमानांकित बुद्धिबळपटू मॅगनूस कार्लसन नोव्हेंबर महिन्यात कोलकात्यात येणार असून तो येथे आयोजित ग्रँड चेस टूर (जीसीटी) रॅपिड अँड ब्लिट्‌झ बुद्धिबळ स्पर्धेत खेळणार आहे. चेन्नई येथे विश्व स्पर्धेत खेळल्यानंतर सहा वर्षांनी कार्लसन विरुद्ध ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यांच्यात सामना रंगणार आहे.
 

 
 
आठव्या चरणाची ही जीसीटी कोलकाता येथे २० ते २७ नोव्हेंबरदरम्यान होणार आहे. महान विश्वविजेता गॅरी कास्पारोव्हच्या प्रेरणेने २०१५ पासून या स्पर्धेला सुरुवात झाली होती. विद्यमान विश्वविजेत्याची कोलकात्यात अशाच प्रकारच्या स्पर्धेत खेळण्याची पहिलीच वेळ आहे. या स्पर्धेत 12 खेळाडू सहभागी होणार आहे. जीसीटी अंतिम स्पर्धा ३० नोव्हेंबर ते ४ डिसेंबरदरम्यान लंडनमध्ये होणार आहे.