पाने पोखरणारी अळी
   दिनांक :26-Feb-2019
भुईमूग हे प्रमुख तेलबिया पीक असून, हे पीक प्रामुख्याने उन्हाळ्यात घेतले जाते. या पिकावर पीक हंगामामध्ये विविध किडींचा प्रादुर्भाव होत असतो. आपण या किडींचे वेळीच नियंत्रण केले नाही तर पिकाचे नुकसान संभवते. सर्वसाधारण किडीमुळे 10-30 टक्केपर्यंत नुकसान होऊ शकते. म्हणून शेतकरीबंधूंनी किडीचे नियमित सर्वेक्षण करून खालील उपाययोजना कराव्या-
1. पाने पोखरणारी अळी : लहान अळ्या पानाच्या आत शिरून, वरील पापुद्रा सलग ठेवून आतील हरितद्रव्य खात नागमोडी मार्गाने पुढे सरकतात. प्रादुर्भावग्रस्त पाने दुरून चमकतात. पाने वाकडीतिकडी होतात आणि वाळतात.
2. पाने गुंडाळणारी अथवा पोखरणारी अळी : लहान अळ्या पाने पोखरतात. पुढे त्या जवळपासची पाने एकत्र करून िंकवा एकाच पानाच्या दोन कडा एकत्र करून गुंडाळी तयार करतात. अशा गुंडाळीत राहून त्या पाने खातात. तीव्र प्रादुर्भावाने पीक जळाल्यासारखे दिसते. पिकाच्या उत्पादनात 24 ते 92 टक्के घट झाल्याची नोंद झालेली आहे. ही कीड सोयाबीन, मूग आणि लुसर्न या पिकाचेही नुकसान करते

 
 
 
उपाययोजना : जोराचा सतत पाऊस व वातावरणातील जास्त आर्द्रतेमुळे किडींची संख्या कमी होते. पीक 40 दिवसापर्यंत तणविरहित ठेवावे. पिकाची योग्य फेरपालट करावी. शेतात अथवा बांधावर बावचीची झाडे असल्यास ती उपटून त्याचा नाश करावा. दोन जिवंत अळ्या प्रतिझाड िंकवा एक अळी प्रतिमीटर ओळ अशी आर्थिक नुकसानीची संकेत पातळी आढल्यास लँब्डा सायहॅलोथ्रीन 5 टक्के प्रवाही 4.0 ते 6.0 मिलि. िंकवा क्विनालफॉस 25 टक्के प्रवाही 28 मिलि. प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
• विभाग प्रमुख,
कीटकशास्त्र विभाग,
डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला