यंदा पाऊस समाधानकारक !
   दिनांक :26-Feb-2019
मुंबई- उन्हाळा सुरु झाल्यानंतर महाराष्ट्रात सर्वात मोठा प्रश्न आवासून उभा असतो, तो म्हणजे दुष्काळाचा ! या दुष्काळावर मात करण्यासाठी समाधानकारक पाऊस पडणे हा एकमात्र उपाय असतो. अश्यात यंदा समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज स्कायमेट या संस्थेने वर्तविला आहे. गेल्या वर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने राज्यासह देशाच्या अनेक भागात दुष्काळाचे सावंत आले होते. नापिकीमुळे शेतकऱ्यांचे हाल झाले होते. २०१९-२० साठीचा पावसाचा पहिला अंदाज स्कायमेट या खाजगी संस्थेकडून वर्तविण्यात आला आहे. यात यंदा पाऊस सर्व सामान्य असणार असून पावसाची सुरवात धीमी असणार आहे.