राशी भविष्य २६ फेब्रुवारी २०१९
   दिनांक :26-Feb-2019


 • मेष : कालचा दिवस कसा गेला, यावर आजचा दिवस अवंबून आहे. काल रात्री घडलेल्या घटनांचा परिणाम आज जाणवेल. प्रकृतीच्या कुरबुरींकडे दुर्लक्ष करू नका. भावंडं येतील आणि आनंद देवून जातील. सासरच्या मंडळींच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतल. मारोतीला सकाळी अंघोळ झाल्यावर एकवीस प्रदक्षिणा घाला.
 • वृषभ : अचानक हवे ते पाहुणे येतील. आप्तमित्रांत दिवस मजेत जाणार आहे. जमल्यास एखादी छोटी सहल कराल. शेतीची जुनी येणी वसुल होतील. कुणाला काही दिले असेल तर आज परत मिळेल. गणपतीला दुर्वा वहा.
 • मिथुन : महत्त्वाकांक्षी योजना राबविण्याचे मनांत येईल. ज्येष्ठांचा सल्ला घेतल्याशिवाय कुठलेही पाऊल टाकू नका. जुने मित्र भेटतील. त्यांचे सहकार्य मिळेल. अंगणात आवळ्याचे झाड लावा.
 • कर्क :तुमचीच जुनी लफडी आज त्रास देतील. अत्यंत शांत मनाने निर्णय घ्या. कुठल्याही मोहात पडू नका. सोने खरेदीचे योग आहेत. गुंतवणूक आज लाभदायी ठरणार आहे. देवीच्या देवळांत जावून ओटी भरा.
 • सिंह : खूप दिवसांचे अस्थेैर्य संपेल. कुणाच्याही फंदात पडू नका. कापडाच्या व्यवसायात आज फायदा आहे. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. कुणालाही शब्द देवू नका, दिलेला शब्द पाळा. अंधारात प्रवास करू नका. आज देवाजवळ अखंड ज्योत ठेवा.
 • कन्या : कुणीतरी येईल अन्‌ आपल्याला मदत करेल, अडचणीतून सोडवील, या भ्रमात राहू नका. स्वत:चे काम स्वत:च करा. देवकार्यात मन रमवाल. घरच्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय घेऊ नका. गणपती स्तोत्र म्हणा.
 • तूळ : तुम्ही काही कामे सुरू केली होती. ती काही कारणांनी बंद पडली आहेत. ती आता पुन्हा सुरू करता येतील. पैशाची तजवीज होईल. कर्ज घेताना विचार करा. प्रवासाचे बेत आखाल आणि त्यात फायदाच होईल. गुरुने दिलेला मंत्र म्हणा.
 • वृश्चिक : तुमच्यावर जबाबदार्‍या आहेत त्या मानाने अधिकार मात्र नाहीत, ही तुमची तक्रार रास्त आहे. ती आज दूर होईल. महत्त्वाची कामे सहज पार पाडाल. निर्णय घेताना सावध असा. महादेवाला दुधाचा अभिषेक करा.
 • धनू : जुने मित्रमंडळी भेटतील. त्यांच्याकडून चांगल्या वार्ता कळतील. तसा आनंदाचा अन्‌ अपेक्षांची पूर्तता होणारा आजचा दिवस आहे. धनलाभ संभवतो. मुंग्यांना साखर टाका.
 • मकर : नोकरदार मंडळींना आज काम दाखवावेच लागेल. कुणाच्या नसत्या ऑफर्स स्वीकारू नका. सर्वांशी मनमिळावूपणे वागा. प्रवासात सावध असा. जप करा म्हणजे चित्त एकाग्र होईल.
 • कुंभ : आज अनेक भाग्यकारक घटना घडतील. आनंदाच्या वार्ता मिळतील. नव्या कामांना सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस विशेष आहे. तुमच्या राशीच्या लोकांनी आज लाल रंगाचे कपडे घालावेत.
 • मीन : व्यवसायात खूप दिवसांपासून मनांत असलेल्या योजनांना आज आकार द्या. गुंवणुकीसाठी आजचा दिवस फायद्याचा आहे. जुनी येणी वसुल होतील. नव्या ठिकाणी जाल. आनंदासाठी देवपूजेत मन रमवा.