पाकिस्तानातील गुगल सर्चमध्ये भारतीय वायूदल टॉप ट्रेंडमध्ये
   दिनांक :26-Feb-2019
 'Pakistan Air Force' पेक्षा 'Indian Air Force' झाला जास्त सर्च 
 
नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानमध्ये घुसून घेतलेल्या बदल्यानंतर भारतीय  वायुसेनेची चर्चा फक्त भारतातच नाही तर पाकिस्तानमध्ये सुद्धा तितकीच होत आहे. याचा पुरावा म्हणजे मंगळवारी दिवसभरात पाकिस्तानी जनतेने गुगलवर पाकिस्तानी वायूदलापेक्षा भारतीय वायूदलाच्या नावाने अधिकवेळा सर्च केल्याचे समोर आले आहे. भारतीय वायूदल मोहीम यशस्वीपणे फत्ते करून माघारी आल्यानंतर याबद्दलची माहिती प्रसारमाध्यमांवर येण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून पाकिस्तानी नागरिकांनी 'Pakistan Air Force' पेक्षा 'Indian Air Force' या नावानेच अधिकवेळा सर्च केले. पाकिस्तानमधील बहुतांश भागांमध्ये हा ट्रेंड दिसून आला. 
 
 
भारत आणि पाकिस्तानात Indian Air force, Pakistan Air Force, Balakot, surgical strike and LoC या पाच कीवर्डसने सर्वाधिक वेळा सर्च करण्यात आल्याचे गुगलच्या पॅटर्न ग्राफमध्ये दिसत आहे. भारतात surgical strike आणि पाकिस्तानमध्ये Balakot हे टॉप ट्रेडिंग कीवर्ड ठरल्याचेही गुगल ग्राफमध्ये दिसून आले.