कृषी क्षेत्रात मोबाईल ॲपचा वापर
   दिनांक :27-Feb-2019
मोबाईल संदेश तंत्रज्ञानाचा जगात सर्वत्र वापर हा संभाषण, माहिती, मनोरंजन इत्यादी बाबतीत तसेच विविध प्रकारच्या सेवा देण्या-घेण्या करीता होताना सर्वच प्रगत देशात होतो आहे. यामध्ये शेती व्यवसायातसुद्धा विविध प्रकारची माहिती या मोबाईल तंत्रज्ञानामुळे त्वरित आपणास उपलद्ध होत आहे. बाजारभाव, नवनवीन पिकांच्या जाती, त्यंाचे लागवड तंत्रज्ञान इत्यादी माहिती मिळणे पूर्वी अवघड होते. परंतु, आजच्या मोबाईल संदेश तंत्रज्ञानाचा वापर लक्षात घेता सदर माहिती एका बटनावर आपण पाहू शकतो. या मुळेच मोबाईलबाबत विविध तंत्रज्ञानाचा झपाट्याने वापर वाढत आहे, त्यामुळे याचा वापरसुद्धा वेगाने वाढत आहे.
 
तसेच या वापरामुळे मोबाईलच्या किमंतीसुद्धा कमी होत आहेत. तरी या तंत्रज्ञानाचा फायदा आपल्या शेती व्यवसायात फारच कमी दिसून येतो. जवळपास सर्वच गावांमध्ये मोबाईल तंत्रज्ञानाचे जाळे पसरविण्यात आले आहे. जवळपास सर्वच मोबाईल धारक विविध ॲपचा वापर विविध प्रकारची माहिती जाणून घेण्याकरिता करताना दिसून येतात.
ॲप म्हणजे हा एक संगणक आज्ञावली असून एखादी अचूक माहिती वापरकत्यास या ॲप ( आज्ञावली ) मार्फत आपणास घेता येते. एप्रिल सन १९७३ साली प्रथम मोबाईलचे उपकरण उदयास आले. परंतु त्याचे वजन फारच जास्त होते.
यानंतर सन १९९६ साली स्पर्शा व्दारे; ग्राफीकल यूजर इंटरफेस (जीयुआय) तंत्रज्ञानावर चालणारे मोबाईलचे उपकरण उदयास आले.
 
सन २००९ नंतर विविध कंपन्याकडून या तंत्रज्ञानावर चालणारे मोबाईल तयार करण्यात आलेत. यामुळे विविध प्रकारचे ॲप तयार करण्यात आले. मुखतः प्रवास, बॅकींग, कॅलेन्डर, विविध गेम, बातम्या, सामाजिक,आरोग्य स्वास्थ इत्यादी प्रकारचे ॲप आज रोजी तयार करण्यात येत आहेत. जवळपास हजारोंच्या संख्येने विविध विषयावर माहितीवर आधारीत ॲप तयार होवून गुगल प्ले स्टोवर उपलब्ध आहेत. जगात भारत हा मोबाईल ॲप डाउलोड करणारा दुसरा क्रमांकाचा देश असून वापर जगाच्या तुलनेत फक्त १३ टक्केच आहे. (ऋर्श्रीीीू अपरश्रूींळली रपव छळशश्रीशप2012) ऐवढी मोठी क्रांती या क्षेत्रात असताना याचा वापर फारच कमी प्रमाणात होताना शेती व्यवसायात होताना दिसून येते.
 
तरी आज भारत संचार निगम यांच्या व्दारे कृषी संचार योजना शेतकर्‍यांसाठी राबविण्यात येत आहे. तसेच विविध कंपन्यांच्या योजनांच्या माध्यामातून मोबाईल डेटा फारच कमी दरात उपलब्ध होत आहे. तरी या संधीचा फायदा शेतकरी बंधूनी आपल्या शेती व्यवसायात करावा. सदर ॲप डाउनलोड करण्याकरिता आपल्या मोबाईल मध्ये इंटरनेटची सोय असणे आवश्यक आहे. तसेच आपला मोबाईल हा थ्री-जी किंवा फोर-जी तंत्रज्ञानावर चालणारा स्मार्ट फोन असावा, याच बरोबर आपल्या मोबाईलमध्ये अँड्रॉईड आज्ञावली आवृती ४.० च्या वर असावी.
• अनिल गोमासे
• डॉ. पंकज भोपळे
• डॉ. विष्णूकांत टेकाळे
   ९४०४३७४४१५ 
विस्तार शिक्षण विभाग, डॉ. पंजाबराव
देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला