केई निशिकोरीची बेनॉईट पायरेवर मात
   दिनांक :27-Feb-2019
दुबई,
दुबई ड्युटी फ्री टेनिस स्पर्धेत प्रथमच खेळताना अव्वल सीड जपानच्या केई निशिकोरीने बेनॉईट पायरेवर ६-४, ६-३ अशी मात केली. आशियाचा अव्वल टेनिसपटू व सहावा विश्वमानांकित निशिकोरीचा आता दुसर्‍या फेरीत हबर्ट हुर्काझविरुद्ध सामना होईल. हबर्टने फ्रान्सचा पात्रताधारी कोरेन्टिन मोऊटेटवर ६-३, ७-५ असा विजय नोंदविला.
 
 
 
लिथुनियाच्या रिकार्डास बेरान्कीसने रशियाच्या डॅनिल मेडव्हेडेव्हवर ६-३, ६-३ अशी, तर अमेरिकेच्या डेनिस कुडलाने इटलीच्या मॅतिओ बेरेटिनीवर २-६, ७-५, ७-५ अशी मात केली. बेलारूसच्या इगोर गेरासिमोव्हने नेदरलॅण्डच्या रॉबिन हसेचा ७-६ (७/२), ७-६ (७/५) असा फडशा पाडला.