सामदा रस्त्यावर कापसाच्या ट्रकला आग
   दिनांक :27-Feb-2019
-शंभर क्विंटल कापूस जळून खाक
दर्यापूर,
जैनपूर येथून कापूस भरून येणार्‍या ट्रकला रस्त्यावरील इलेक्ट्रीक वायरचा स्पर्श झाल्याने अचानक आग लागली. या आगीत जवळपास १०० क्विंटल कापूस जळून खाक झाल्याची माहिती मिळाली आहे. आज दूपारी जैनपूर येथील आढवू नामक शेतकर्‍याचा कापूस एका व्यापार्‍याने विकत घेतला व तो कापूस खाजगी जीनिंगमध्ये विक्रीसाठी आणण्यात येत होता.
 
 
 
सामदा गावाजवळून ट्रक जात असताना रस्त्यावरच्या विद्युत तारेचा ट्रकमधल्या कापसाला स्पर्श झाल्याने स्पार्किंग झाले. कापसाने पेट घेतला. जोरदार हवा सुरु असल्याने या आगीने रौद्ररूप धारण केले. चालकाने ट्रक थांबवून बाहेर उडी घेतली. सामदा गावातील लोक धावून आले. त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी अग्निशमन दलाला फोन करून बोलावले. तातडीने अग्निशमन पोहोचले मात्र तो पर्यंत कापूस जळून खाक झाला होता. या घटनेमुळे अकोला मार्ग काही काळ बंद झाला होता. दर्यापूर पोलिस पुढील चौकशी करीत आहे