पाकिस्तानचा खोटा दावा; दोन विमाने पाडली, दोन वैमानिक ताब्यात
   दिनांक :27-Feb-2019
इस्लामाबाद :
 भारतीय हवाई दलाने पाकिस्तानवर केलेल्या ' एयर स्ट्राईक ' हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानी हवाई दलाने आज भारतात घुसून प्रतिहल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र भारतीय हवाई दलाने हा हल्ला हाणून पाडला. दुसरीकडे पाकिस्तानच्या हद्दीत घुसलेली दोन विमाने पाडण्यात आली असून, दोन वैमानिकांना ताब्यात घेतल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.
 
 
 
एकीकडे पाकिस्तानकडून भारताची विमाने पाडून त्यातील दोन वैमानिकांना अटक केल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यापैकी एक वैमानिक जखमी झाला असल्याचाही दावा पाकिस्तानने केला आहे. मात्र पाकिस्तानने यासाठी दाखवलेले व्हिडिओ आणि पुरावे खोटे असल्याचे समोर आले आहे. तसेच आधी झालेल्या विमान अपघाताचे व्हिडिओ पाकिस्तानकडून शेअर करण्यात आले आहे.
 
 
पाकिस्तानचे लष्करी अधिकारी मेजर जनरल आसिफ गफूर यांनी सांगितले की, भारताची दोन विमाने पाडून त्यातील दोन वैमानिकांना अटक केली आहे. पाडण्यात आलेल्या विमानांपैकी एक विमान पाकिस्तानच्या हद्दीत तर एक भारताच्या हद्दीत पडले,'' असा दावा त्यांनी केला.