शहीद जवानांच्या कुटुंबियांना १ कोटीची मदत करणार- लता मंगेशकर
   दिनांक :27-Feb-2019
१४ फेब्रुवारील जम्मू-कश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या CRPF च्या ताफावर झालेल्या हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीयाचा संताप अनावर झाला होता. काल हवाई दलाने पाकिस्तानवर १००० किलो वजनाची स्फोटके टाकून बॉम्बहल्ला केला. यानंतर बॉलिवूड स्टार्सनी भारतीय वायुसेनेना सलाम केला. तर पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहिद जवानांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देण्यासाठी देखील बॉलिवूडचे कलाकार मागे राहिले नाही. या यादीत अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, सलमान खान यांच्यानंतर गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे नावदेखील सामील झाले आहे.

 
एक मुलाखती दरम्यान, लता मंगेशकर यांनी सांगितले की, वडील दीनानाथ मंगेशकर यांच्या पुण्यातिथीला म्हणजेच 24 एप्रिलला त्या 1 कोटी रुपयांची मदत शहिद जवानांच्या कुटुंबियांना देणार आहेत. पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर लता दीदी खूप दु:खी होत्या. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर या हल्ल्याची निंदादेखील केली होती.