रोल
   दिनांक :28-Feb-2019
भारतात सर्वत्र खाल्ल्या जाणारा सहजरीत्या बाजाराच्या गल्यांंमध्ये, चौकात, रेस्टॉरेंटमध्ये व तारांकीत हॉटेल्समध्ये आपल्याला विविध प्रकारचे रोल चाखायला मिळतात. भारतात राहणार्‍या विविध लोकांच्याआवडी प्रमाणे सर्वत्र उपलब्ध ‘रोल’ आवडीनुसार बदलता असतो. त्यात तिथली स्थानिक चव असते आणि यातूनच आपल्याला चाखायला मिळतो विविध चविष्ट रोल. काही पदार्थ मुळात मांसाहारी आहेत, असा शाकाहार घेणार्‍यांचा समज असतो. पण त्याचे व्हेज प्रकारही तितकेच रूचकर आणि चविष्ट आहेत. कटलेट, कबाब, रोल हे पदार्थ अत्यंत रूचकर अशा शाकाहारी पद्धतीने तयार करता येतात, तर बाजारात देखील सहजरीत्या उपलब्ध असतात. रोल हा पदार्थ मुळात पोळीपासून तयार होणारा आहे. हा प्रकार चविष्ट तर असतोच पण पौष्टिकही आहे. मुलांना, मोठ्याांना आवडेल आणि त्याचे पोट भरेल, असा हा पदार्थ आहे. रोजच्याच जेवणातला साध्या पद्धतीने तयार होणारा पण थोडा हटके आहे. रोल हा असा पदार्थ आहे, ज्याद्वारे नावडीच्या भाज्या सुद्धा आवडीने खाल्ल्या जातात.
वेज स्प्रिंगरोल्स, पनीर रोल, ब्रेडरोल
पावसाळ्यात भाजी खाऊन कंटाळा आला तर मोठ्यांना पण चटपटित बटाट्याच्या सारणाचे ब्रेडरोल उत्तम राहील. यात आपण शॉलोफ्राय केलेले काही रोल पाहुया जसे-
 

 
बटाट्याच्या कच्च्या भरीताचे रोल्स : यासाठी बटाट्याचे सारण तयार करून ब्रेड लाटून त्यात सारण भरून पाण्याने कडाजोडून तुप, बटर, तेल लाऊन रोल खुशखुशीत भाजुन घ्या. या ठिकाणी आपण पोळीसुद्धा वापरू शकतो.
दही रात्रभर पाणी निथळून घेतलेल िंकवा बारीक करून घेतलेले पनीर, मेओनिज, इ. कुठलही एक क्रम घेऊन त्यात आवडीप्रमाणे भाज्या आपण घालु शकतो. जसे विविध रंगाच्या शिमला मिर्च, पानकोबी, इ. कुठलीही भाजी आणि थोडे मसाले जसे थोड चिलीफ्रेक्स (लाल मिर्च्यांचीजाडसर भुरड) मिक्स हब, कुटलेली काळी मिरी आणि एक लसणाची कडी ठेचुन घेतलेली हे मिश्रण उत्तमरीत्या एकत्र करून पोळीत घालून मस्त सॅण्डविच रोल तयार होतो.
 कुठलेही ज्याम पोळीलाा लाऊन जेव्हा आपण मुलांना देतो, तेव्हा त्यात बारीक केलेला सुखेमेवा घातला तर ते उत्तम ठरतात. कधी-कधी वेगळ खायची इच्छा झाली तर झटपट तयार होणारा हा पदार्थ आहे.
प्रमोदिनी निखाडे