टवटवीत चेहर्‍यासाठी...
   दिनांक :28-Feb-2019
टवटवीत चेहर्‍यासाठी...
 
सुंदर आणि टवटवीत चेहर्‍यासाठी त्वचेची काळजी घेणे, आवश्यक असते. टॅिंनग, मुरूम आणि ब्लॅकहेड्स याकडे दुर्लक्ष केल्यास चेहर्‍यावर काळे डाग पडू लागतात. तसेच आपल्या जीवनशैलीमुळे आणि पाणी कमी पिल्याने डोळ्याखाली डार्क सर्कल्स पडू लागतात. डार्क सर्कल्सकडे दुर्लक्ष केल्याने ते डोळ्याखालचे काळे डाग गडद होतात. हे डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी आपण विविध क्रिम आणि ट्रिटमेंट करीत असतो. डाग कमी करण्यासाठी मिळणारे क्रिम महाग असून यामध्ये अधिक प्रमाणात रसायनिकांचा समावेश असते. तसेच घरगुती पद्धतीने सुद्धा डार्क सर्कल कमी करता येते. यासह योग्य आहाराचे सेवन केल्याने त्वचेची समस्या निर्माण होत नाही. डार्क सर्कल कमी करण्यासाठी नारळ तेल, टमाटर आणि दूध उत्तम आहे. डार्क सर्कल कमी करण्यासाठी काय उपाय केले पाहिजे, याबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे.

नारळ तेल : 
केसांसाठी आणि त्वचेसाठी नारळाचे तेल फायद्याचे असते. डोळ्याखालचे डार्क सर्कल कमी करण्यासाठी नारळाचे तेल उत्तम आहे. रात्री झोपण्याधी एक्स्ट्रा व्हर्जिन नारळ तेलाने डोळ्याखालच्या भागावर मसाज करावे. डोळ्याखालचे तेल सकाळी कोमट पाण्याने धुऊन घ्यावे. नियमित नारळाचे तेल लावल्याने डोळ्याखालचे डाग कमी होतात. तसेच नारळाच्या तेलामध्ये व्हिटॅमिन-ई आणि अँटीऑक्ससिडेंट्स असल्यामुळे हे तेल त्वचेसाठी उत्तम आहे. डोळ्याखाली सूज असल्यास नारळाचे तेल वापरावे. सूज कमी करण्यासाठी नारळ तेलाचे मसाज उत्तम असते. बाजारात एक्स्ट्रा व्हर्जिन नारळ तेल न मिळाल्यास साधे तेल सुद्धा तुम्ही डार्क सर्कल साठी वापरू शकता.
 
काकडी : 
 
डार्क सर्कलसाठी काकडी उत्तम असून डोळे दुखत असल्यास काकडी १० मिनिटांसाठी डोळ्यांवर ठेवावे. तसेच डार्क सर्कला लगेच कमी करण्यासाठी काकडी उत्तम आहे. काकडी ला ५ ते ७ मिनिटांसाठी लिंबाच्या रसात ठेवावे. यानंतर काकडी डोळ्यावर ठेवावे. लिंबाच्या रस डोळ्यात जाऊ नये म्हणून डोळ्यांवर कापूस ठेवावे. डार्क सर्कलसाठी ‘व्हिटॅमिन सी’ उत्तम आहे. तसेच काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते त्वचेला हायड्रेट करण्यास मदत करते.
 
टमाटर :

त्वचेला मऊ करण्यासाठी आणि डार्क सर्कल कमी करण्यासाठी टमाटर उत्तम आहे. तसेच टमाटरमध्ये ब्लिचिंगचे गुण असल्यामुळे डोळ्याखालची डाग कमी करण्यासाठी ते उत्तम आहे. बाजारात विविध मास्क डार्क सर्कलसाठी उपलब्ध असून घरगुती पद्धतीने सुद्धा हे मास्क तयार करता येते. टमाटर आणि निंबुच्या रसाला एकत्र करून एक मास्क तयार करता येते. हे मिश्रण डोळ्याखाली मिनिट लावून ठेवावे. यानंतर हे मिश्रण पाण्याने धुवून घ्यावे. हे मिश्रण डार्क सर्कलवर नियमित लावावे.
 
थंड दूध :

दुधात लॅक्टिक ॲसिड असल्यामुळे डोळ्यांखालची सूज कमी करण्यासाठी थंड दूध उत्तम आहे. सुख्या त्वचेवर सुद्धा दूध वापरले जाते. डार्क सर्कल कमी करण्यासाठी थंड दुधात कापूस भिजून ठेवावे. पाच मिनिटानंतर हे कापूस डोळ्यांवर काही मिनिटासाठी ठेवावे. नियमित थंड दूध लावल्याने डार्क सर्कल आणि डाग कमी होतात.
 
टी-बॅग्स :

थकल्यावर डोळ्यांमध्ये आग होत असल्यास टी- बागचे वापर करावे. तसेच डार्क सर्कल कमी करण्यासाठी सुद्धा टी-बॅग उत्तम आहे. टी-बॅगला आधी गरम पाण्यात ५ मिनिटांसाठी ठेवावे. यानंतर हे टी-बॅग एका डब्ब्यात बंद करून फ्रिजमध्ये अर्ध्या तासासाठी ठेवावे. हे थंड झालेले टी-बॅग डोळ्यांवर ५ मिनिटांसाठी ठेवावे. असे केल्याने डार्क सर्कल कमी होत असून डोळ्यावरची सूज सुद्धा कमी होते. तसेच डार्क सर्कल जास्त असल्यास हे टी-बॅग जास्त वेळेसाठी डोळ्यावर ठेवावे. टी-बॅग लावण्यापूर्वी हे बॅग चांगल्या प्रकारे पिळून घ्यावे.
 शृष्टी परचाके