आजचे पंचांग; दि. २८-०२-२०१९
   दिनांक :28-Feb-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- २८ फेब्रुवारी २०१९
 
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक २८ फेब्रुवारी २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक फाल्गुन ०९ शके १९४०
☀ सूर्योदय -०६:३८
☀ सूर्यास्त -१८:१४
प्रात: संध्या - स.०५:४६ ते स.०६:५९
सायं संध्या - १८:३५ ते १९:५०
अपराण्हकाळ - १३:५७ ते १६:१७
प्रदोषकाळ - १८:३५ ते २१:०४
निशीथ काळ - २४:२२ ते २५:१२
राहु काळ - १४:१९ ते १५:४७
श्राद्धतिथी - दशमी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:३७ ते दु.०१:५७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
 
काय करू नये : 
आज पडवळ व दुधीभोपळा खावू नये. 🚫
 
काय करावे : 
आज पिवळे वस्त्र परिधान करावे. 
 
लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त-- १२:४७ ते १४:१५💰💵
अमृत मुहूर्त-- १४:१५ ते १५:४२ 💰💵
विजय मुहूर्त— १४:४५ ते १५:३१
 
पृथ्वीवर अग्निवास १०:२१ नंतर.🔥
राहु मुखात आहुती आहे.
शिववास सभेत १०:२१ पर्यंत नंतर क्रीडेत,काम्य शिवोपासनेसाठी अशुभ दिवस आहे. 🚫
 
पंचांग 
शालिवाहन शके -१९४०
संवत्सर - विलंबी
अयन - उत्तरायण
ऋतु - शिशिर (सौर)
मास - माघ
पक्ष - कृष्ण
तिथी - नवमी (१०:२१ पर्यंत)
वार - गुरुवार
नक्षत्र - मूळ
योग - वज्र (१३:३७ नंतर सिद्धियोग)
करण - गरज (१०:२१ नंतर वणिज)
चंद्र रास - धनु
सूर्य रास - कुंभ
गुरु रास - वृश्चिक
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण
पं. देवव्रत बूट ०९४२२८०६६१७
विशेष - श्रीरामदास नवमी ,सज्जनगड यात्रा,मृत्यूयोग १०:२१ पर्यंत नंतर सिद्धियोग
👉 या दिवशी पाण्यात हळद घालून स्नान करावे.
👉 दत्त कवच या स्तोत्राचे पठण करावे.
"बृं बृहस्पतये नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 दत्तगुरुंना पुरणाचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस हरभरा डाळ दान करावी.
👉 दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दहि प्राशन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- मिथुन,कर्क,तुळ,धनु,कुंभ,मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.