आजचे राशी भविष्य; दिनांक २८ फेब्रुवारी २०१९
   दिनांक :28-Feb-2019
 • मेष : आजचा दिवस तुमच्या कुटुंबाचा आहे. कुटुंबासोबत दिवस आनंदात घालवाल. कामे बाजूला सारून सहकुटुंब प्रवासाला जाल. आर्थिक बाबतीत अत्यंत संपन्न असा दिवस आहे. कमाईच्या ठिकाणी तुम्हाला चांगला दिवस. व्यंकटेश स्तोत्र म्हणा.
 • वृषभ : भाऊबंद अचानक भेटीला येतील. व्यवसायात स्पर्धेला सामोरे जावेच लागेल. लहान मुले आणि घरांतील स्त्रियांना आज संधी उपलब्ध होतील. नोकरदारांना नव्या संधी मिळतील. मात्र, विचार करूनच निर्णय घ्यायचा आहे. पांडूरंगाला तुळशीचा हार घाला.
 • मिथुन : खूप दिवसांपासून दिलेले कर्ज परत मिळू शकते, मात्र त्यासाठी प्रयत्न करताना कटुपणा येणार नाही याची दक्षता घ्या. शअेर मार्केटमध्ये गुंवणूक करा. आर्थिक स्थिती चांगली राहील. तब्येतीकडे लक्ष द्या. विष्णूसहस्त्रनाम वाचा.
 • कर्क : नव्या कामांचा शुभारंभ करण्यासाठी आजचा दिवस अत्यंत शभ आहे. केलेल्या कामाचे यथोचित फळ पदरी पडेल. कुणाच्या कामात ढवळाढवळ करू नका. या हाताने दिलेले त्या हाताला कळू देवू नका. आज गोमातेची पूजा करा.
 • सिंह : स्वत:चा व्यवसाय असणार्‍यांना आज अनेकांची मने राखावी लागतील. त्यासाठी वेळी आपल्या मनाला मुरड घालावी लागेल. मात्र त्याचा फायदाच होईल. शेजार्‍यांनी दिलेल्या वस्तू आठवणीने परत करा. कुणालाही दुखावू नका. महादेवाची आराधन करा.
 • कन्या : आज तुम्हाला चंद्रबळ साथ देईल. शुक्र तुमच्या पाठिशी कायमच आहे. आज लाभदायक ग्रहमान आहे. तुमच्या घराण्याच्या गावाकडून बोलावणे येईल. जुन्या इस्टेटीच्या व्यवहारात गुंतावेच लागणार आहे. प्रवासाचेही योग आहे. आज चांगला मणी घाला.
 • तूळ : आज तुमचा दिवस आहे. घरी आणि कामाच्या ठिकाणीही तुमचे महत्त्व सार्‍यांनाच कळणार आहे. हवे ते अधिकार आणि पगारवाढ किंवा इन्सेटिव्हज्‌ मिळतील. ज्यांच्या हाती अधिकाराची पदे आहेत त्यांनी निर्णय घेताना सावध असणे गरजेचे आहे. मारोतीची उपासना फलदायी आहे.
 • वृश्चिक : तुमचे कुणी नातेवाईक परदेशांत असतील तर त्यांच्याकडून अचानक लाभ आहे. वायुमार्गाने भ्रमण करण्याचा योग आज सिद्ध होईल. घरांतल्या लहान मुलांची खास काळजी घ्या. वडिलधार्‍यांचा शब्द आज प्रमाण आहे. काळे तीळ महादेवाला वहा.
 • धनू : मौनंम्‌ सवार्थ साधनम्‌, हे आजच्या दिवसाचे तुमचे सुत्र आहे. जास्त बोलू नका. कुटुंबात वेळ घालवा. जलदगती वाहनांपासून दीर रहा. आज तुम्हाला अग्नीचे भय आहे. शेतीच्या व्यवहारात तुम्हाला लाभ आहे. कुलदेवतेला अभिषेक करा.
 • मकर : गेल्या काही दिवसांपासून असलेली अस्थिरता आज संपेल. परस्त्री प्रेमात पडेल. मात्र त्यापासून धोका नाही. कुटुंबात कलह होणार नाही. लेखनाच्या क्षेत्रांत असलेल्या मंडळींना आज नावलौकि मिळेल. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवा. तपकिरी रंग आज तुम्हाला लाभदायी आहे.
 • कुंभ : आज प्रकृतीकडे दुर्लक्ष अजिबातच करू नका. कफाचे विकार असणार्‍यांनी विशेष काळजी घ्यायची आहे. नाका समोर पाहून चला. कुणाच्या फंदात पडू नका. बांधकाम काढायचे असेल तर आजचा दिवस त्यासाठी उत्तम आहे. सरस्वती मातेची आराधना करा.
 • मीन : गेल्या अनेक दिवसांपासून मनांत असलेले धाडस आज बिनदिक्कत करा. महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यासाठी आजचा दिवस अत्यंत चांगला आहे. कुणाला कसलाच शब्द देवू नका. जोडीदाराला खूष ठेवा. नवे वस्त्र खरेद कराल. गावदेवीच्या मंदिरात दान करा.