१३ तासांत गाठले २०० किमीचे अंतर; इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :03-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
औरंगाबाद-
 
 
जिद्द आणि प्रचंड मेहनतीच्या बळावर औरंगाबादच्या अभिजित बंगाळेने लहान मुलांच्या सायकलवरून २०० किमीचे अंतर १३ तासात गाठण्याचे विक्रम केला आहे. त्याच्या या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड््समध्ये नोंद करण्यात आली आहे . २० इंचाच्या लहान सायकलवरून हे अंतर झटपट गाठणारा हा देशातील पहिला सायकलपटू ठरला आहे. त्याने १ नोव्हेंबर २०१८ रोजी हा पराक्रम गाजवला. या विक्रमी कामगिरीबद्दल त्याचा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या वतीने प्रमाणपत्र आणि पदक देऊन गौरव करण्यात आले . तो औरंगाबाद येथे वास्तव्यास आहे. त्याने यादरम्यान कोणत्याही एनर्जी व इलेक्ट्रॉल या ऊर्जा वाढवणाऱ्या द्रव्यांचे सेवन केले नाही.
 
 
 
 
 यादरम्यान त्याला कमी उंचीमुळे गुडघा अाणि पाठदुखीच्या त्रासाला सामोरे जावे लागले. मात्र, त्याने याची पर्वा न करता मोठ्या जिद्दीने हा आव्हानात्मक पल्ला यशस्वीपणे गाठला. ता सायंकाळी ७ वाजता ते क्रांती चौक येथे दाखल झाला.
 
"हा विक्रमाचा पल्ला यशस्वीपणे गाठल्यामुळे माझा आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे. आता माझी नजर १,०००, १२००, १४०० किमी अंतर पूर्ण करण्यावर लागली आहे. यासाठीचा मी निर्धार केला आहे. आता मी या मोहिमेवर लवकरच निघणार आहे." असे अभिजित म्हणाला