एक लाखाचा गांजा जप्त; दोघांना अटक
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :03-Feb-2019
वर्धा : बसस्थानकावर अमरावती येथून वर्धेत गांजा येत असल्याच्या गुप्त माहितीवरून शहर पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १ लाख ५ हजार रुपये किमतीचा १० किलो ५०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई २ फेब्रुवारी रोजी रात्री करण्यात आली.
 

 
 
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा बसस्थानकावर अमरावती येथून गांजा घेऊन येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारावर पोलिसांनी बसस्थानकावर सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांनी गांजा विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. त्याच्याकडून १० किलो ५०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी अब्दुल रजिक अब्दुल जलाल आणि प्रवीण धर्मळ या दोघांना अटक करण्यात आली.