राणा दग्गुबतीला मिळाली हॉलिवूडची ऑफर
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :03-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली 2’ या चित्रपटात खनायकाची भूमिका साकारणारा राणा दग्गुबती च्या अभिनयाची चर्चा आता हॉलिवूड मध्ये होऊ लागली आहे. ताज्या वृत्तानुसार, राणाला एका मोठ्या हॉलिवूडपटाची ऑफरआली आहे आणि सध्या याची जोरदार चर्चा सुरु आहे.
 
 
 या चित्रपटात राणाला एक दमदार रोल ऑफर करण्यात आले आहे. राणाने ही ऑफर स्वीकारली की नाही, हे अद्याप समजू शकलेले नाही. त्यामुळे राणा ही ऑफर स्वीकारतो की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सध्या राणा ‘हाथी मेरे साथी’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ‘हाथी मेरे साथी’ हा चित्रपट तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून त्याची बहुतांश शूटिंग मुंबईत होणार आहे. त्याशिवाय तो आगामी ‘हाऊसफुल ४’ या चित्रपटातही झळकणार आहे.